अहिल्यानगर : पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा येथील कान्होबा उर्फ तांबुलदेव देवस्थानमध्ये गुरुवारी एका गटाने महाआरती करत देवस्थानवर असलेल्या कळसावर भगवा झेंडा लावला. अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. जवखेडे खालसा येथे देवस्थांनात आरती करू देण्याची मागणी एका गटाने केली होती. दुसऱ्या गटाने त्याला विरोध दर्शवला होता. हा वादात मध्यस्थी करत महसूल व पोलिसांनी दोन्हीही गटाच्या बैठका घेतल्या मात्र तोडगा निघाला नाही.

आज देवस्थानमध्ये महाआरती करणार असा निर्णय एका गटाने जाहीर केला होता. दुपारी राजळे, जगताप यांच्यासह अशोक महाराज पालवे, संभाजी पालवे, सरपंच चारुदत्त वाघ आदींसह कार्यकर्ते देवस्थानच्या आवारात पोहोचले. देवस्थानबाहेर रस्त्यावर वाहनांची रांग लागली होती.यावेळी बोलताना आमदार जगताप म्हणाले, छत्रपतींच्या भगव्याचे रक्षण करण्यासाठी आम्ही येथे आलो आहोत, छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान व त्यांचा झालेला छळ आम्ही विसरू शकत नाही. हा अहिल्यानगर जिल्हा असून या जिल्ह्यात कोणावरही अन्याय झाला तर आपण सर्वांनी धावून जायला हवे. जो भगवाधारी आहे त्याने समर्पण करावे. प्रशासनाने या प्रकरणाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न करू नये. आम्ही शांततेच्या मार्गाने महाआरती करत आहोत. मते मागण्यासाठी आम्ही येथे आलो नाहीत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आमदार राजळे म्हणाल्या, की आपण आपल्या देवस्थानची कागदपत्रे तलाठ्याला हाताशी धरून त्यात फेरफार करण्यात आला. वक्फ बोर्डाच्या किचकट कायद्याचे भोग आपल्याला जरी भोगावे लागत असले तरीही आता केंद्र सरकारने वक्फ बोर्डाचा विषय आपल्या हाती घेतला आहे. हिंदूंना एकत्र येत हा कलंक आता पुसून टाकावा लागणार आहे. आपण शांत राहतो ही चूक असून गोरक्षकावरील हल्ल्यासंदर्भात आपण येत्या अधिवेशनात प्रश्न उपस्थित करणार आहोत.