धाराशिव, : अडगळीत पडलेल्या दोनजणांना आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मी लोकप्रतिनिधी केले. ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून येण्याची ज्याची लायकी नाही, त्याला आमदार केले. त्यांनी आपल्यावर खूप शिंतोडे उडविले. आपल्यामुळेच ते राजकारणात जीवंत झाले. तेरणा कारखान्यातील भंगार सुध्दा विकले. शेतकर्‍यांची तर वाट लावली. जे काही असेल ते हम और हमारा कुटुंब. कोणताही ठेका असो तो मामाला, काकाला आणि भावाला, अशीच पध्दत होती. जय भवानी, जय शिवाजी म्हणणारे शिवसैनिक यांनीच देशोधडीला लावले, अशा प्रखर शब्दांत मंत्री तानाजी सावंत यांनी विरोधकांसह मित्रपक्षांवर जोरदार फटकारे ओढले.

हेही वाचा >>> धाराशिव: अहंकाराची गाडी दाढीमुळेच खड्ड्यात! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उध्दव ठाकरेंना टोला

abhishek banerjee challenges amit shah
“हिंमत असेल तर माझ्या विरोधात निवडणूक लढवून दाखवा”, ममता बॅनर्जींच्या पुतण्याचे अमित शाह यांना आव्हान; म्हणाले, “जी व्यक्ती…”
Delhi Police issues notice to Telangana Chief Minister Revanth Reddy for tampering with Home Minister Amit Shah footage
तेलंगणच्या मुख्यमंत्र्यांना चौकशीसाठी पाचारण; गृहमंत्री अमित शहा यांच्या चित्रफितीत फेरफार केल्याचा आरोप
jitendra awhad eknath shinde Insult news
“ठाण्यात मुख्यमंत्र्यांचा अपमान, माझ्यासारख्या विरोधकालाही वाईट वाटलं”, जितेंद्र आव्हाडांचा महायुतीला टोला!
eknath shinde
महायुतीच्या सर्व जागा बहुमताने निवडून येणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा, म्हणाले ‘शेतकऱ्यांना मदत…’

ढोकी येथील तेरणा कारखाना परिसरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या शिवसेनेच्या कार्यकर्ता मेळाव्यात पालकमंत्री सावंत बोलत होते. धाराशिव जिल्ह्यातील सहकारी संस्था मागील सत्ताधार्‍यांनी मोडीत काढल्या. तेरणा कारखान्याची काय अवस्था करून टाकली होती? आपल्या सर्वांना माहिती आहे. दूध संघाचीही तीच अवस्था. जिल्हा सहकारी बँकही देशोधडीला लावली. शिवसैनिकांसाठी यांनी एकही काम केले नाही. जिल्ह्यातील सहकारी चळवळ जिल्ह्यातीलच पुढार्‍यांनी मोडीत काढली. मुख्यमंत्री म्हणून आपण सर्वांसमक्ष आश्वासन द्यावे, आपल्या माध्यमातून जिल्ह्यातील पिचलेला शेतकरी आणि मोडीत निघालेली सहकार चळवळ पुन्हा एकदा जिवंत करण्याचे काम आपण करणार आहोत. यासाठी जिल्हावासीयांच्या वतीने मी आपल्याकडे मागणी मागत आहे, असेही मंत्री तानाजी सावंत यांनी सांगितले. ही सगळी व्यवस्था पुन्हा एकदा नव्याने उभी करावयाची आहे. कारण सहकार चळवळीत मोठ्या आदराने राज्यातील ज्या एक-दोन जिल्ह्यांचे नाव घेतले जात होते, त्यात धाराशिव जिल्हा प्राधान्याने येत होता. राज्यासमोर या जिल्ह्याने विविध उपक्रम राबविले आहेत. ते सगळे विधायक उपक्रम मोडीत निघाले आहेत. हे सगळे कशामुळे झाले? असा सवाल उपस्थित करीत माझ्या शेतकरी बांधवांना रस्त्यावर वनवन करीत फिरण्याची वेळ कुणामुळे आली, असा टोकदार प्रश्नही मंत्री सावंत यांनी यावेळी उपस्थित केला.

हेही वाचा >>> राज ठाकरे महायुतीला पाठिंबा देणार? मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत काय ठरलं? देशपांडे म्हणाले, “हिंदुत्त्ववादी विचारांचे…”

मुख्यमंत्री महोदयांचे उंबरठे झिजवून प्रसंगी रडून, हट्ट करून त्यांच्याकडून शहराच्या विकासासाठी कोट्यवधी रूपयांचा निधी आणला. त्यावेळी मुख्यमंत्री महोदयांकडे नगरविकास खाते होते. शेकडो कोटी रूपये शहराच्या विकासासाठी ज्यांनी आणले, त्यांनीच आज शहर बकाल करून टाकले आहे. शहराचा अक्षरशः उकिरडा झाला आहे. शहरवासीयांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था देण्यातही यांना यश आलेले नाही. आजही आठ दिवसाआड एकदा शहरात पाणीपुरवठा केला जातो. शहरातील रस्ते, गल्लीबोळ, कचर्‍याच्या ढिगाखाली दबले आहेत. कचरा उचलण्यासाठी यांच्याकडे पैसे नाहीत. शेकडो कोटी रूपये आणलेला निधी कुठे गेला, असा खरमरीत सवालही सावंत यांनी उपस्थित केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच शहरातील रस्त्यांसाठी १५४ कोटी रूपये मंजूर केले आहेत. अद्याप अध्यादेश निघावयाचा आहे, तोवरच फलकबाजी सुरू आहे. निधी आम्ही आणला आणि फलक दुसरे झळकावत आहेत, अशा शब्दात मित्रपक्षाचा कान पिळायलाही सावंत विसरले नाही. तेरणा कारखाना भाडेकराराने घेत असताना कोण अडचणी निर्माण करत होते? हे सर्वांना माहिती आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दम दिला आणि लातूरकरांनी पाय आखडून घेतले, अशा शब्दांत पालकमंत्री तानाजी सावंत यांनी लातूरच्या देशमुखांवरही निशाणा साधला.