मोठ्या टेकात ते म्हणतात, दाढीला पकडून, खेचून आणले असते. मुख्यमंत्री असताना अडीच वर्षात ज्यांना वर्षा निवासस्थानाची साधी माडी उतरता आली नाही, ते दाढीपर्यंत कसे पोहोचतील? तुमच्या अहंकाराची गाडी या दाढीनेच खड्ड्यात घातली आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उध्दव ठाकरे यांना फटकारले.

धाराशिव जिल्ह्यातील ढोकी येथे आयोजित करण्यात आलेल्या मिशन-४८ शिवसंकल्प – कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत, आमदार ज्ञानराज चौगुले, माजी खासदार रवींद्र गायकवाड, मराठवाडा विभागीय अध्यक्ष आनंदराज जाधव, सोलापूर संपर्कप्रमुख शिवाजी सावंत, जिल्हाप्रमुख दत्ता साळुंके, सहसंपर्क प्रमुख अनिल खोचरे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत, लातूर जिल्हाप्रमुख शिवाजी माने यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

Sanjay Raut On Devendra Fadnavis
संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांना खोचक टोला; म्हणाले, “राजकारणातलं कच्चं मडकं…”
Devendra Fadnavis
“सदाभाऊ यावेळी संधी पक्की, पण पुढच्या वेळी…”; देवेंद्र फडणवीसांचं शिंदे गटाच्या नेत्याबाबत मोठं विधान
salim kutta marathi news, sudhakar badgujar tadipar marathi news
शिंदे गटाच्या मेळाव्यात ’सलीम कुत्ता‘ नावाने घोषणाबाजी, दुसऱ्याच दिवशी नाशिक जिल्हा ठाकरे गटाचे प्रमुख सुधाकर बडगुजर यांना तडीपारीची नोटीस
congress leader prithviraj chavan attacked modi government in public meeting in sangvi
नरेंद्र मोदींच्या विरोधात प्रचंड मोठी लाट – पृथ्वीराज चव्हाण; सांगवीतील जाहीर सभेत महाविकास आघाडीच्या नेत्यांचा मोदी सरकारवर प्रहार
Former Chief Minister Uddhav Thackeray
“आजच्या सरकारला डोकं नाही, फक्त…”; उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीसांवर हल्लाबोल
Udayanraje Bhosale Full Speech
उदयनराजे भोसले यांची शशिकांत शिंदेंवर खोचक टीका; म्हणाले, “कपाटं आणि खिशाला…”
thane lok sabha marathi news, naresh mhaske marathi news
नरेश म्हस्केंच्या मिरवणुकीकडे गणेश नाईक समर्थकांची पाठ
uddhav devendra Fadnavis
“मी नागपुरी आहे, त्यामुळे मला त्यांच्यापेक्षा…”, देवेंद्र फडणवीसांचं उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ टीकेला प्रत्युत्तर

हेही वाचा >>> राज ठाकरे महायुतीला पाठिंबा देणार? मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत काय ठरलं? देशपांडे म्हणाले, “हिंदुत्त्ववादी विचारांचे…”

कणकवली येथील जाहीर सभेत उध्दव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार प्रतिहल्ला केला होता. मिंद्यांची दाढी पकडून आणले नसते का? मात्र जे सडलेले आहेत, तेवढ्यांना जाऊ दिले, अशा शब्दांत ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांचा समाचार घेतला होता. धाराशिव येथील सभेत मुख्यमंत्र्यांनी तोच धागा पकडत उध्दव ठाकरे यांना शेलक्या शब्दांत प्रतिउत्तर दिले. या दाढीकडे तुमच्या खूप नाड्या आहेत, हे विसरू नका. मला बोलायला भाग पाडू नका, माझा नाद करू नका, मला हलक्यात घेऊ नका. तुम्ही हलक्यात घेतले. मात्र त्यामुळे दोन वर्षांपूर्वी काय घडले? ते सगळ्या जगाने पाहिलेले आहे. त्यात माझा काहीही स्वार्थ नव्हता, अशी पुष्टीही मुख्यमंत्री शिंदे यांनी बोलताना जोडली.

हेही वाचा >>> Breaking: अखेर शरद पवार गटाला नाव मिळालं, ‘या’ नावावर निवडणूक आयोगाचं शिक्कामोर्तब!

मागील विधानसभा निवडणुकीत हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडून तुम्ही वागलात. त्यामुळे शिवसेना वाचविण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या भाळी आलेला बेईमानीचा शिक्का पुसण्यासाठी आम्ही धाडसी निर्णय घेतला. स्वतःला मर्द समजता, तर दररोज मर्द आहोत म्हणून सांगत कशाला सुटता? असे ओरडून सांगण्याची वेळ तुमच्यावर का येते? असे खोचक प्रश्नही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी उपस्थित केले. तुम्ही कितीही आरोप करा, हा एकनाथ शिंदे कामाने उत्तर देईल. मुख्यमंत्री पदावर बसलो असलो तरी काल, आज आणि उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करीत राहणार आहे. काम करणार्‍या महायुती सरकारला महाराष्ट्रातील जनता भरभरून आशीर्वाद देत आहे. त्यामुळे आगामी लोकसभेच्या निवडणुकीत ४५ पेक्षा अधिक जागा निवडून आणल्याखेरीज राहणार नाही, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.