हिंदू नव वर्ष आणि गुढीपाडव्याचा उत्साह आज राज्यभरातील अनेक शहरांमध्ये दिसून आला. मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबईमध्ये दरवर्षीप्रमाणे स्वागतयात्रा आयोजित करण्यात आल्या होत्या. मुंबईतील गिरगाव, डोंबिवलीतील फडके रोड आणि ठाण्यातील राम मारुती रोड येथे शोभायात्रेनिमित्त ढोलताशा पथक, लेझीम, पारंपरिक नृत्य आणि वेगवेगळ्या विषयांवरील चित्ररथांची रेलचेल दिसून आली. या शोभायात्रांमध्ये अगदी लहानांपासून मोठ्यांनीही आवर्जून हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले. यंदाचा पाडवा रविवारी आल्याने यावर्षी शोभायात्रेचा उत्साह आणि उपस्थितांची संख्या तुलनेने अधिक होती असे म्हटल्यास हरकत नाही. याच वेगवेगळ्या शहरांमधील शोभायात्रांचे लोकसत्ता डॉट कॉमच्या टीमने केलेल्या कव्हरेजचे व्हिडीओ…