शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव टाकरे आणि शिंदे गटाचे आमदार गुलाबराव पाटील यांच्यातलं घमासान सुरूच आहे. उद्धव ठाकरे प्रत्येक भाषणातून बंडखोर आमदारांवर हल्लाबोल करत आहेत. तर गुलाबराव पाटील देखील त्यावर प्रत्युत्तर देत आहेत. आज (८ एप्रिल) रायगडमध्ये बोलताना त्यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. तसेच ज्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीने शिवसेनेचं नुकसान केलं त्यांच्यासोबत तुम्ही बसला आहात असा टोलाही लगावला.

गुलाबराव पाटील म्हणाले की, ज्या काँग्रेसने आम्हाला (शिवसैनिकांना) तुडवलं, ज्या काँग्रेसने आम्हाला संपवलं. ज्या राष्ट्रवादी काँग्रेसने तीन वेळा आमचा पक्ष फोडला. त्यांच्यासोबत तुम्ही (उद्धव ठाकरे) मांडीला मांडी लावून बसला आहात. राष्ट्रवादीने तीन वेळा आमचा पक्ष फोडला. आधी छगन भुजबळांना फोडलं, मग नारायण राणेंना आणि मग राज ठाकरे यांना फोडलं. आज तुम्ही त्याच काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाल्यांसोबत जाऊन बसला आहात.

हे ही वाचा >> “अजित पवार नॉट रिचेबल?” विरोधी पक्षनेत्यांनी पत्रकारांना सुनावलं, म्हणाले, “बंद करा ते”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गुलाबराव पाटलांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

पाटील म्हणालेकी, आमचा पक्ष फोडणाऱ्यांसोबत उद्धवसाहेब जाऊन बसले आणि आम्हाला गद्दारांच्या रांगेत उभं केलं आहे. पण साहेब आम्ही ४०-४०, ५०-५० खटले आमच्या अंगावर घेऊन ही शिवसेना उभी केली आहे. १९९२ च्या दंगलीत आम्ही तिघे भाऊ आणि आमचा बापही चार महिने तुरुंगात राहिला. केवळ शिवसेना हा शब्द खाली जाता कामा नये म्हणून आम्ही बलिदान दिलं, शिवसैनिकांनी बलिदान दिलं. त्या बलिदान देणाऱ्या शिवसैनिकांना तुम्ही गद्दार म्हणत असाल आणि या गद्दारांच्या भरवशावर खासदार झालेल्या संजय राऊतला तुम्ही खुद्दार म्हणत असाल तर परमेश्वर तुमचं भलं करो.