महाराष्ट्रात शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपाचं बहुमताचं सरकार असूनही गेल्या महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतला अजित पवारांचा गट सत्तेत सहभागी झाला आहे. या सरकारला भाजपा आणि शिवसेनेचे नेते ट्रिपल इंजिन सरकार किंवा त्रिशूळ सरकार म्हणत आहेत. दरम्यान, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी या सरकारचं मार्मिक शब्दात वर्णन केलं आहे. पाटील म्हणाले, आमच्या सरकारचं कसं चाललंय? वर भाजपा, कंबर शिवसेनेची आणि हातपाय राष्ट्रवादीचे, असं चाललंय.

गुलाबराव पाटील म्हणाले, आम्ही स्थिर लोक आहोत. आमच्यावर गद्दारीचे आरोप झाले, वर्षभर आम्ही ते ऐकले. आम्ही त्यांना कामाने उत्तर देतोय. अरे तुम्ही कामाचं बोला रे! तुम्ही पण पालकमंत्री होता, तुम्ही चार वर्ष पालकमंत्री होता. तू तेरा गल्ला बता, मैं मेरा गल्ला बताता हूं, तुम्ही चार वर्ष पालकमंत्री होता. तुमच्याकडे ९ खाती होती. तसेच, त्यावेळी आजच्यासारखं तीन जणांचं सरकार नव्हतं, तेव्हा एकच सरकार होतं. आता तर तीन जणांचं सरकार आहे, वर भाजपा, मध्ये कंबर शिवसेना आणि हातपाय राष्ट्रवादीचे, असं चित्र आहे. तरी पण आम्ही कामं करत आहोत.

हे ही वाचा >> “अजित पवार मुख्यमंत्री होणारच नाहीत”, संभाजीराजेंच्या वक्तव्यावर भाजपाची प्रतिक्रिया; म्हणाले, “२०२४ पर्यंत…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विरोधकांवर बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले, आम्हाला त्यांच्याशी (विरोधक) भानगड करायची नाही, त्यांचा विरोधही नाही. कुठल्या पक्षावर बोलायचं नाही. परंतु, हेच लोक आमच्यावर बोलतात. हे लोक आधी आमच्यावर बोलायचे, पन्नास खोके, सबकुछ ओके अशा घोषणा द्यायचे. आता अजित पवार आमच्याबरोबर आल्यानंतर यांचं तोंड उघडत नाही. हे राष्ट्रवादीवाले आता काय बोलत नाहीत. मुळात ही राष्ट्रवादी कोणाची ते सिद्ध करा आधी. राष्ट्रवादी शरद पवारांची आहे की अजित पवारांची हे सिद्ध करा. तुम्ही अजित पवारांचा सत्कार करताय, तसेच शरद पवार झिंदाबाद म्हणताय, काय चाललंय.