वकील गुणरत्न सदावर्ते नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर त्यांनी अनकेदा टीका केली आहे. काही दिवसांपूर्वी एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावरून शरद पवार यांच्या निवासस्थानी दगडफेक करण्यात आली होती. ही दगडफेक वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या सांगण्यावरून झाल्याचा आरोप आहे. हे प्रकरण चर्चेत असताना आता गुणरत्न सदावर्ते यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांच्यावर सडकून टीका केली आहे.

यावेळी गुणरत्न सदावर्ते यांनी शरद पवारांचा उल्लेख राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी असा केला. तसेच जनसंघाच्या ताकदीपुढे शरद पवार चिल्लर आहेत, अशी टीका सदावर्ते यांनी केली. यवतमाळ येथील कार्यक्रमात भाषण करताना त्यांनी ही टीका केली.

शरद पवारांना उद्देशूव गुणरत्न सदावर्ते म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार… तुम्ही तुमच्या मागे-पुढे फिरवून वैचारिक दिवाळखोर तयार केले. जनसंघ दोनच संघ मान्य करतंय. एक भगवान गौतम बुद्धांचा संघ आणि दुसरा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. हे दोन्ही संघ वैचारिकदृष्ट्या सुदृढ आहेत. जनसंघाच्या ताकदीपुढे शरद पवारही चिल्लर आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“अजित पवारांनी शहाणपणा करण्याचा प्रयत्न केला तर…”

वकील गुणरत्न सदावर्ते यांनी अजित पवारांवरही टीका केली. दिवाळीच्या चार दिवस आधी माझ्या कष्टकऱ्यांचं विलिनीकरण आणि सातवा वेतन आयोग लागू करावा. यासाठी अजित पवारांनी खोडा घालण्याचा प्रयत्न केला किंवा अर्थखातं आहे म्हणून शहाणपणा करण्याचा प्रयत्न केला, तर दिवाळीच्या चार दिवस आधी माझा एसटी कर्मचारी स्टेरिंगवर बसणार नाही. ते गाडी चालवू शकणार नाहीत, असं माझं सरकारला सांगणं आहे, असंही सदावर्ते म्हणाले.