पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज ७० वा वाढदिवस आहे. या निमित्ताने त्यांच्यावर जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सोशल मीडियावर त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केल्या जात आहेत. अनेक देशांच्या राष्ट्रप्रमुखांसह नेत्यांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री, नेते आणि मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांची पत्नी अमृता फडणवीस यांनीही पंतप्रधान मोदी यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारताला इतर कोणत्याही देशाचे अनुकरण करण्याची गरज नाही! भारत हा फक्त भारतच बनला पाहिजे कारण एकेकाळी भारताला ‘सोने का चिड़िया’ म्हटलं जात होतं असं पंतप्रधान मोदी यांचं वक्तव्य होतं. हे वाक्य ट्विट करत अमृता फडणवीस यांनी मोदींचा उल्लेख ‘नव्या भारताचे पितामह’ असा केला आहे. पंतप्रधान मोदींसारख्या अनुभवी नेतृत्वाला (विकासाचा) मार्ग माहिती आहे, ते मार्ग जाणतात आणि मार्ग दाखवतात! अशा दूरदर्शी नेतृत्वाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, असेही त्यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील पंतप्रधान मोदी यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

फडणवीस पती-पत्नीव्यतिरिक्त भारतातील आणि जगभरातील नेतेमंडळींनीही मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत. खासदार आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ट्विटरवरुन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा, मी आपल्या चांगल्या आरोग्यासाठी आणि आनंदासाठी प्रार्थना करतो. दोन्ही देशांच्या संबंधांना अधिक मजबूत करण्यासाठी मिळून काम करुयात, असे ट्विट त्यांनी केले आहे. तसेच फिनलँडच्या पंतप्रधान सना मरीन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. दोन्ही देशांचे संबंध दृढ होवोत, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Happy birthday pm modi amruta fadnavis wish tweet devendra fadnavis vjb
First published on: 17-09-2020 at 11:49 IST