कागलचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या घर आणि मालमत्तांवर सक्तवसुली संचालनालयाने नुकतीच छापेमारी केली. तसेच साखर कारखाना घोटाळ्याप्रकरणी त्यांना ईडीने समन्स धाडलं आहे. दरम्यान, ईडीच्या कारवाईनंतर भाजपाकडून मुश्रीफांवर टीका सुरू झाली आहे. भाजप नेत्यांनी मुश्रीफांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं आहे. कोल्हापूर भाजपाचे अध्यक्ष समरजित घाटगे म्हणाले की, तपासासाठी ईडीची टीम जेव्हा हसन मुश्रीफांच्या घरी दाखल झाली होती. तेव्हा मुश्रीफ घराच्या मागच्या दरवाजाने पळून गेले होते.

समरजित घाटगे मुश्रीफ यांना उद्देशून म्हणाले की, ईडीची टीम तुमच्या घरी आली तेव्हा तुम्ही मागच्या दाराने तुम्ही पळून का गेलात? मी खूप जबाबदारीने बोलतोय की, ईडीच्या धाडीनंतर हसन मुश्रीफ तब्बल ५२ फरार होते. तसेच काही तासांसाठी त्यांची तिन्ही मुलंदेखील फरार होती. ईडीची धाड पडल्यानंतर मुश्रीफ माध्यमांसमोर यायचे, त्यांच्या कुटुंबासोबत असायचे. परंतु यावेळी ते नॉट रिचेबल होते. त्यांची मुलं, वाहनचालक, खासगी सल्लागार, पर्ननल स्टाफ सर्वजण नॉट रिचेबल होते.

“मुश्रीफांनी लाजिरवाणं कृत्य केलं” : घाटगे

ईडीच्या धाडीनंतर मुश्रीफ फरार झाले, त्यानंतर थेट ५२ तासांनंतर ते प्रकट झाले. धाडीनंतर मुश्रीफ यांच्या घरातले सर्व पुरूष हे स्त्रियांना घरात एकटं सोडून पळून गेले. एका राज्यकर्त्याने इतकं लाजिरवाणं कृत्य केलं आहे. स्वतःला वाचवण्यासाठी त्यांनी घरातल्या स्त्रियांना वाऱ्यावर सोडून दिलं. पत्नी, सुना आणि लहान मुलांना एकटं सोडलं.

हे ही वाचा >> दोन बायका, कोर्टाचा अजब निर्णय ऐका…! मध्य प्रदेशमधल्या न्यायालयाने सोडवलं दोन बायकांचं भांडण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

घाटगे यांचा तिखट सवाल

आपल्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडणारी व्यक्ती कशावरून आपल्या मतदार संघाला वाऱ्यावर सोडणार नाही? शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही? असा सवालही घाटगे यांनी उपस्थित केला.