तुम्ही नेहमी खिचडी भात किंवा फोडणीचा भात नेहमीच खात असाल. कधी आंबट चिंच भात खाऊन पाहिला आहे का? नसेल तर नक्की ट्राय करा. ही चविष्ट आणि हटके रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल. विशेष म्हणजे हा भात तयारा करायला फारसा वेळही लागत नाही. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल असा हा पर्याय आहे.

चिंच भात कसा तयार करावा?

साहित्य : १ कप तांदूळ, १/4 कप पिकलेली चिंच, २ चमचे स्पून हरभरा डाळ (ऐच्छिक), ३ वाळलेल्या लाल मिरच्या , 1/4 कप तेल, अर्धा चमचा मोहरीचे दाणे, १/4 कप तेल, अर्धा चमचा मोहरीचे दाणे., १/4 चमचा हळद पावडर, अडीच चमचा धने, १ चमचा तीळ, चिमूटभर हिंग, ६ मेथीचे भाजलेले दाणे. १/4 भाजलेले शेंगदाणे, चवीसाठी मीठ.

कृती : तांदूळ शिजवा, १ कप गरम पाण्यात ३० मिनिटे चिंच भिजवा. चिंचेचा कोळ काढा आणि अर्धा कप पाणी वाढवा. चांगले ढवळा आणि कोळ गाळून घ्या. ३० मिनिटे हरभरा डाळ भिजत ठेवा. गाळून घ्या आणि टिश्यू पेपरवर सूकवा. लाल मिरच्यांचे तुकडे करा, तेल तापवा, त्यात मोहरी टाका, मोहरी तरतडून लागताच त्यात डाळ टाका व लालसर होईपर्यंत ढवळा.

हेही वाचा : हेल्दी अन् टेस्टी पनीर धिरडे, नाश्त्यापासून जेवणापर्यंत केव्हाही खाऊ शकता! जाणून घ्या रेसिपी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मिरच्या टाका, मिनिटभर ढवळा आणि त्यात चिंचेचा कोळ आणि हळदीची पावडर आणि मीठ टाका. मिश्रण टोमॅटोच्या पेस्टप्रमाणे होईपर्यंत उकळवा. अगोदर पूडकरुन ठेवलेले सर्व मसाले चांगले एकत्र करा आणि भातामध्ये टाकून ढवळा. भात शिजेपर्यंत मंद आचेवर ठेवा. वाढताना भाजलेल्या शेंगदाण्यांनी सजावट करा.