शिंदे गटातील नेते तथा आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महादेवाशी तुलना केली आहे. करोना काळात भारत सरकारने अन्य देशांना केलेल्या मदतीचा संदर्भ देत मोदी यांनी केलेली मदत म्हणजे वैराग्याचे, महादेवाचे लक्षण आहे, असे तानाजी सावंत म्हणाले आहेत. ते आज (१० फेब्रुवारी) माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.

हेही वाचा >>> Cow Hug Day : ‘काऊ हग डे’ वरून केंद्र सरकारची माघार! निर्णय घेतला मागे, ‘हे’ आहे कारण

नरेंद्र मोदींवर टीका करण्यात आली

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सेवाभावी वृत्ती आहे. तुम्ही पाहिले असेल की करोनाकाळात अनेकांनी त्यांच्यावर राजकीय टीका केली. आपल्याकडे लसीकरणाची गरज असताना, आपल्या देशात १५० कोटी लोकसंख्या असताना तुम्ही बाहेरदेशात लसपुरवठा करत आहात, अशी टीका करण्यात आली,” असे तानाजी सावंत म्हणाले.

हेही वाचा >>> हरियाणा सरकारचे अजब धोरण! डॉक्टरांसाठी लागू केला नवा ड्रेस कोड, जिन्स परिधान करण्यास मनाई; मेकअपही…

…असा विचार मोदी यांनी केला नाही

“पण आपल्या भारताला विश्वाचा विचार करणारा नेता लाभला. मोदी यांनी जगाचा विचार केला. जगातील जनता तसेच भारतातील जनता यांच्यातील आत्म एकच आहे. म्हणूनच आपल्या देशात औषधांचा साठा करून ठेवायचा, असा विचार मोदी यांनी केला नाही,” असेही सावंत म्हणाले.

हेही वाचा >>> सेन्सॉरशिप घालू शकत नाही सांगत, सुप्रीम कोर्टाकडून ‘बीबीसी’ विरोधातली हिंदू सेनेची याचिका निकालात

कित्येक देशात ३० ते ४० टक्के लोकांचा मृत्यू झाला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मोदी यांच्यात वैराग्याचे पर्यायाने महादेवाचे लक्षण आहे, असेही तानाजी सावंत म्हणाले. “आपली हर्ड इम्यूनिटी चांगली आहे. इतर देशांवर करोनाचा जास्त परिणाम झाला. कित्येक देशात ३० ते ४० टक्के लोकांचा मृत्यू झाला. म्हणूनच त्यांनी लसीचा पहिला हात जगाला दिला. दुसरीकडे आपल्याकडे लसीकरणाचेही काम सुरूच होते. म्हणूनच मी म्हणतो की हे वैराग्याचे लक्षण आहे. हे तर महादेवाचे लक्षण आहे,” असे सावंत म्हणाले.