scorecardresearch

ब्रिटिशांच्या भीतीपोटी हेडगेवारांनी नेताजींची भेट नाकारली -राऊत

ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी वणी येथे केलेल्या वक्तव्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

यवतमाळ : ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी वणी येथे केलेल्या वक्तव्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. आद्य सरसंघचालक हेडगेवार हे ब्रिटिशांचे गुलाम होते. ते कारागृहात टाकतील या भीतीने त्यांनी सुभाषचंद्र बोस यांची भेट नाकारली, असा दावा केला. ज्यांनी जाती-जातींत वाद निर्माण केले तेच आज आम्हाला शिकवत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली. वणी येथील शेतकरी मंदिरात सोमवारी एका कार्यक्रमात राऊत बोलत होते. पुसद येथे डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या स्मरणार्थ संग्रहालय उभारण्याचा केंद्राचा प्रस्ताव आहे. याबाबत सध्या वाद सुरू आहे.

राऊत यांनी अभ्यास करावा – भुतडा

सरसंघचालक हेडगेवार यांच्यासंदर्भात बोलण्यापूर्वी ऊर्जामंत्री राऊत यांनी अभ्यास करावा, असा सल्ला भाजप जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांनी दिला आहे. काँग्रेस पक्षानेच देशाला खरा इतिहास माहिती होऊ दिला नाही, अशी टीका भुतडा यांनी केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Hedgewar refuses to meet netaji for fear of british nitin raut zws