scorecardresearch

नुकसानीच्या पंचनाम्यासाठी सुशिक्षित तरुणांची मदत – सत्तार

कृषी सहायक, ग्रामसेवक व तलाठी संपामध्ये असल्याने पीक पंचनाम्यासाठी थोडी अडचण आहे.

ABDUL SATTAR-compressed (1)
अब्दुल सत्तार – संग्रहित छायाचित्र / लोकसत्ता

बीड : अवकाळीमुळे पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी संकटात आहे. कृषी सहायक, ग्रामसेवक व तलाठी संपामध्ये असल्याने पीक पंचनाम्यासाठी थोडी अडचण आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांची उपलब्धता नसेल, तर पंचनामे करण्यासाठी बी. एसस्सी. (अ‍ॅग्री) व इतर शिकलेल्या तरुणांकडून काही काम करून घेता येईल का, अशी विचारणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. आमच्या लोकांनी, शासकीय कर्मचाऱ्यांनी संप परत मागे घेतला नाही, तर पर्यायी व्यवस्था करावी लागेल, अशी स्पष्ट भूमिका कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी मांडली. कृषी कार्यालयाच्या वतीने मिलेट दौडच्या उद्घाटनप्रसंगी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी माध्यमांशी संवाद साधला. मंत्री सत्तार म्हणाले, की राज्यातील एकही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आदेश आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 19-03-2023 at 00:02 IST