यंदा एमपीएससी आणि सीईटी या परीक्षा एकाच दिवशी आल्यामुळे परीक्षार्थींसमोर पेच निर्माण झाला होता. अनेक परीक्षार्थी एमपीएससी आणि सीईटी अशा दोन्ही परीक्षांची तयारी करत असतात. मात्र, यंदा २१ ऑगस्ट रोजीच दोन्ही परीक्षा आल्यामुळे नेमकं करायचं काय? असा प्रश्न परीक्षार्थींसमोर उभा राहिला. त्यासंदर्भात आता उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी परीक्षार्थींसाठी मोठी घोषणा केली असून त्यांच्यासाठी तारीख बदलण्याचा पर्याय देण्यात येईल असं ते म्हणाले आहेत.

परीक्षार्थींनी काय करायचं?

या दोन्ही परीक्षांसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची अडचण होऊ नये यासाठी या CET च्या सेलला संपर्क करण्यास सांगण्यात आलं आहे. ज्या परीक्षार्थींना दोन्ही परीक्षा द्यायच्या आहेत, त्यांना CET परीक्षेसाठी तारीख बदलून घेण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे.

Teacher
२४ हजार शिक्षकांची भरती रद्द, मिळालेला पगारही चार आठवड्यांत परत करण्याचे निर्देश; नेमकं प्रकरण काय?
Law College Student Attendance
विधी महाविद्यालय विद्यार्थी उपस्थिती : ७५ टक्के उपस्थितीच्या नियमाच्या अंमलबजावणीचे आदेश देण्याची न्यायालयाला मागणी
How many candidates appeared in the last offline set exam The set will be held twice a year
शेवटच्या ऑफलाइन सेट परीक्षेला किती उमेदवारांची उपस्थिती? सेट वर्षातून दोनवेळा होणार?
High Court relief
वैद्यकीय विषयाच्या विद्यार्थ्याला उच्च न्यायालयाचा दिलासा, पुनपर्रीक्षेची गुणपत्रिका देण्याचे राज्य शिक्षण मंडळाला आदेश