scorecardresearch

महाबळेश्वरमधील स्थळांची ब्रिटिश नावे बदलण्याची मागणी ; भाजप-हिंदू एकता आंदोलनाच्यावतीने निवेदन

महाबळेश्वर, पाचगणी या पर्यटनस्थळांवर आकर्षक जागांना ब्रिटिशांनी आपआपल्या अधिकऱ्यांची नावे दिलेली आहेत.

mahabaleshwar
(संग्रहित छायाचित्र)

वाई: महाबळेश्वरातील सर्व स्थळांना (पॉईंटस) ब्रिटिशांनी दिलेली नावे बदलण्याची मागणी हिंदू एकता आंदोलन आणि भाजपच्यवतीने महाबळेश्वर तहसीलदारांकडे निवेदनाव्दारे केली आहे. १५ ऑगस्टपर्यंत ही इंग्रज अधिकाऱ्यांची नावे बदलून त्यांना क्रांतिकारकांची नावे न दिल्यास ही नावे बदलण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.

महाबळेश्वर, पाचगणी या पर्यटनस्थळांवर आकर्षक जागांना ब्रिटिशांनी आपआपल्या अधिकऱ्यांची नावे दिलेली आहेत. जुन्या नोंदीमध्ये महाबळेश्वरला गव्हर्नरच्या नावाने माल्कम पेठ म्हटले गेले. पुढे ब्रिटिशांनी येथे अनेक स्थळांना विकसित करत त्यास स्वत:च्या अधिकाऱ्यांचीच नावे दिलेली आहेत. आज गेली अनेक वर्षे ही स्थळे या नावांनीच ओळखली जातात. स्वातंत्र्यानंतर ७५ वर्षे होऊन गेली तरी आजही ही स्थळे इंग्रज अधिकाऱ्यांच्या नावानेच परिचित आहेत. ही परकियांची नावे बदलत त्यांना  क्रांतिकारकांची नावे देण्याची मागणी आता भाजप आणि हिंदू एकता आंदोलन समितीने केली आहे.

ब्रिटिशांनी नावे बहाल केलेले पॉईंट्स ऑर्थरसिट, विल्सन पॉईंट, लॉडविक पॉईंट, लेस्ली विल्सन , केटस् , एलिफन्ट हेड, निडल होल पॉईंट, बेबीन्टन , इको पॉईंट, बॉम्बे , वॉटर फॉल , किंग चेअर , विंडो , इको , हिन्टग , टायगर स्प्रिंग , कॅसल रॉक , मंकी , मरजोरी , कॅटस , मिडल , सनसेट , प्लॅटो , वेण्णालेक , पारसी

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-07-2022 at 03:47 IST

संबंधित बातम्या