भरधाव कारने दुचाकीला मागून दिलेल्या धडकेत माय-लेकाचा मृत्यू झाला. हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील ब्रह्मपुरी पाटीजवळ काल (रविवार) रात्री ही घटना घडली.

खुडज येथील ज्ञानेश्वर झाडे (वय २५) व त्यांची आई सावित्रीबाई जयजयराम झाडे (५५) हे दुचाकीवरून केसापूरला जात असताना, त्यांना कारने पाठीमागून धडक दिली ज्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. अपघातात सावित्रीबाईंचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी असलेल्या ज्ञानेश्वर यांना प्रथम हिंगोलीतील रुग्णालयात नेण्यात आले. मात्र प्रकृती अधिक गंभीर असल्याने नांदेड येथे नेण्यात आले. तेथे त्यांचाही मृत्यू झाला. खुडस गावात आज (सोमवार) सकाळी दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे खुडज गावावर शोककळा पसरली आहे.

Nanded, married couple suicide,
नांदेड : नवविवाहित दाम्पत्याची गळफास घेऊन आत्महत्या, कंधार तालुक्यातील कळकावाडीतील घटना
gondia Tragic Drowning Incident, Drowning Incident, Husband and Wife dead, tirora taluka, chorkhamara village, gondia news, Drowning news,
गोंदिया : तलावात बुडून पती-पत्नीचा मृत्यू
painganga river three drowned marathi news
नांदेड: पैनगंगा नदीपात्रात बुडून तिघांचा मृत्यू; मृतांमध्ये चुलतीसह दोन पुतणी, माहुर तालुक्यातील घटना
heart attack in the swimming pool
धक्कादायक! ‘स्विमिंग पूल’मध्येच हृदयविकाराचा झटका