देशविदेशात आपले वेगळे आकर्षण आणि अस्तित्व टिकवून असलेला सातपुडय़ातील होलिकोत्सवाला सुरुवात झाली आहे. राज्यात फाल्गुन पौर्णिमेला होळी पेटवून सर्वत्र होलिकात्सव साजरा केला जात असतांना आदिवासी संस्कृतीचा आद्य सण असलेला होलिकात्सव सातरपुडय़ात पाच दिवस साजरी केला जातो. सातपुडय़ातील विविध परिसरात पंचमीपर्यंत पारंपरिक वाद्य आणि वेशभूषा परिधान करून विविध ठिकाणच्या मानाच्या होळ्या पेटवल्या जातात. मात्र, सर्वाधिक आकर्षण असते ते मानाच्या राजवाडी काठी होळीचे. याच वैशिष्टय़पूर्ण होळीचा आनंद घेण्यासाठी लाखो आदिवासी बांधवांसह देशातील विविध भागातील पर्यटक सातपुडय़ात दाखल झाले आहेत.

साडेसातशे वर्षांहून अधिक परंपरा असलेला काठी संस्थानच्या राजवाडी होळीचे आकर्षण आजही कायम असून या होलिकात्सवाची तयारी पूर्ण झाली आहे.

रविवारी रात्री लाखो आदिवासी बांधव एकत्र येऊन पहाटे पाचच्या सुमारास ही होळी पेटवतात. लाखो आदिवासी बांधवांची श्रद्धास्थान असलेला या होलिकोत्सवाची भोंगऱ्या बाजाराने सुरुवात होत असते. होळीच्या आधी येणाऱ्या आठवडी बाजारात पारंपरिक वेषात मानक ऱ्यांची वेशभूषा करून होलिकात्सवासाठी खरेदी केली जाते. काठीच्या या होळीसाठी आदिवासी बांधव खास मानून बाबा, बुवा, डाणका डोहा आणि बुध्याचा वेषपरिधान करून ब्रम्हचर्यत्वाच्या व्रताचे पालन करतात. काठीच्या या मानाच्या होळीसाठी खास ७० फुटीबांबु गुजरातहून आणला जातो.

काठीच्या वडाच्या झाडाखाली पारंपरिक पद्धतीन पुजाअर्चा करून काठीचे राजा उमेदसिंह यांच्या राजगादीची पुजाही करण्यात येते. हा बांबू ज्या ठिकाणी गाडला जाऊन होळी पेटवली जाते त्या ठिकाणी कुठल्याही हत्याराचा वापर न करता हाताने कोरून आदिवासी बांधव खड्डा करतात, तर दुसरीकडे मध्यप्रदेश,गुजरात आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून काठी पारंपरिक ढोलताशाच्या तालावर थिरकत शेकडो किलोमीटरची पायपीट करत लाखो आदिवासी बांधव याठिकाणी दाखल होतांना दिसतात. हा सगळे विहंगम आणि विलोभनीय दृश्य टिपण्यासाठी पर्यटकांनीही काठी येथे मोठय़ा प्रमाणात गर्दी केलेली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

होळी पेटवल्यानंतर होळीचा दांडा पूर्व दिशेला पडल्यास येणारे वर्ष सुख समृद्धीचे राहील, असा समज आदिवासी बांधवांमध्ये आहे. सोमवारी पहाटेच्या सुमारास ही होळी पेटल्यानंतर मोलगी न अंबाबारी, असली, तोरणमाळ, अशा विविध ठिकाणच्या होळीचा उत्सव साजरा होणार असल्याने येत्या सप्ताहभर सातपुडय़ाच्या दऱ्याखोऱ्यात होलिकोत्सवाची धुम कायम राहणार असून ढोल आणि बिजरीसारख्या पारंपरिक वाद्याचा सूर घुमणार आहे.