इयत्ता बारावीच्या परीक्षा ४ मार्चपासून सुरु झाल्या आहेत. कोरोना महामारीनंतर पहिल्यांदाच या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होत आहेत. कोणतीही तांत्रिक चूक होऊ नये म्हणून महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने योग्य ती खबरदारी घेतलेली आहे. मात्र असे असतानाही शिक्षण मंडळाकडून एक चूक झालीय. याच चुकीमुळे मंडळाला विद्यार्थ्यांना एक आगावीचा गुण द्यावा लागणार आहे. या एका गुणाची लॉटरी लागल्यामुळे विद्यार्थी आनंद व्यक्त करत असून त्यासाठी उद्योगपती रतन टाटा यांचे आभार मानत आहेत.

परीक्षेत मिळणारा आगावीचा एक गुण आणि रतन टाटा यांचा काय संबंध असा प्रश्न सर्वांनाच पडला असेल. मात्र रतन टाटा यांनी दिलेल्या स्पष्टीकरणामुळेच विद्यार्थ्यांना हा एक गुण दिला जातोय. मुळात शिक्षण मंडळाने इंग्रजी विषयाच्या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना एक वाक्य दिले होते. हे वाक्य रतन टाटा यांनी म्हटल्याचा समज बोर्डाचा झाला.पेपरमध्ये दिलेले हे वाक्य साध्या वाक्यामध्ये बदलण्यास सांगण्यात आले होते. मात्र हे वाक्य रत टाटा यांचे नव्हते. तसे स्पष्टीकरण टाटा यांनी अनेकवेळा दिले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रतन टाटा यांनी यापूर्वी दिलेले स्पष्टीकरण आणि पेपरच्या प्रिंटिंगमध्ये झालेली चूक बोर्डाच्या लक्षात आली. त्यानंतर शिक्षण मंडळाने या प्रश्नाचे उत्तर दिलेल्या सर्वांना एक गुण देण्याचे जाहीर केले. दरम्यान, एक गुण कमी मिळाल्यामुळे अनेक विद्यार्थी अणुत्तीर्ण होतात. मात्र शिक्षण मंडळाकडून दिल्या जाणाऱ्या या आगावीच्या गुणामुळे अनेक विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होण्यास मदत मिळेल. याच कारणामुळे विद्यार्थी रतन टाटा यांचे आभार मानत आहेत.