अनैसर्गिक सेक्ससाठी जबरदस्ती करणाऱ्या पतीविरोधात पत्नीने तक्रार दाखल केली आहे. पुण्याच्या कल्याणी नगरमध्ये राहणाऱ्या ३१ वर्षीय इराणीयन महिलेने पतीविरोधात एफआयआर दाखल केला आहे. अनसैर्गिक पद्धतीने सेक्स करण्यासाठी जबरदस्ती करण्याबरोबरच पती आपल्याला शिवीगाळही करतो असा आरोप या महिलेने केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तक्रारदार महिला मूळची इराणची असून तिचा पती ऑस्ट्रेलियन व्यावसायिक आहे. सध्या हे जोडपे पुण्यात कल्याणी नगरमध्ये राहायला आहे. येरवडा पोलिसांनी पती विरोधात गुन्हा दाखल करुन घेतला आहे. नवरा आपल्याला मारहाण करतो तसेच जीवे ठार मारण्याची धमकी देतो असे या महिलेने पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Husbund forcing wife for unnatural sex
First published on: 28-05-2018 at 13:56 IST