शिवसेनेत बंडखोरी करून एकनाथ शिंदे यांनी भाजपाला साथ दिली. भाजपाच्या साथीने त्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तर, लागलीच वर्षभराने राष्ट्रवादीतही फूट पडून अजित पवारांनी भाजपाला समर्थन दिलं. शिंदे गट, अजित पवार गट भाजपासोबत आल्यानंतर भाजपाची ताकद वाढली आहे. त्यामुळे शिंदेंसोबतची भाजपा आवडते की पवारांसोबतची भाजपा आवडते असा प्रश्न भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांना विचारण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

हेही वाचा >> पंतप्रधानपदासाठी दुसरा चेहरा आहे का? उद्धव ठाकरेंच्या प्रश्नावर एकनाथ शिंदेंचं उत्तर; म्हणाले “रावणाला…”

एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडत शिवसेनेतील आमदारांना सोबत घेत भाजपासह सत्ता स्थापन केली. या सत्तेत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदी विराजमान झाले तर, देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. तर, वर्षभराने अजित पवारांनीही महाविकास आघाडीला रामराम ठोकत राष्ट्रवादीतील आमदारांसह भाजपाला समर्थन दिले. त्यामुळे विरोधी बाकावर असलेले अजित पवार थेट उपमुख्यमंत्री झाले. यामुळे शिवेसना आणि राष्ट्रवादीचा भाजपाला पाठिंबा मिळाला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याबाबत बोलताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, “मला शिंदेंसोबतची भाजपा आवडत नाही आणि अजित पवारांसोबतचीही भाजपा आवडत नाही. मला भाजपा हा देशाची सेवा करणारा पक्ष आवडतो.” त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वातावरणात आता उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.