शिवसेना फुटीचं प्रकरण सर्वोच्च न्यायालयातून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या दरबारी गेले आहे. मे महिन्यांत सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण राहुल नार्वेकरांकडे सुपूर्द केलं. तेव्हापासून आतापर्यंत केवळ दोनच सुनावणी होऊ शकल्या. या दोन्ही सुनावणीचा निर्णयही अद्याप गुलदस्त्यात आहे. दरम्यान, या सर्व प्रकरणावर ज्येष्ठ घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी टीका केली आहे. त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधत शिवसेना, राष्ट्रवादी फुटीसंदर्भात संवाद साधला.

उल्हास बापट म्हणाले की, “भाजपाचे वंकय्या नायडू हे अत्यंत आदर्श उदाहारण आहेत. ते राज्यसभेचे अध्यक्ष झाले तेव्हा त्यांनी भाजपाचा राजीनामा दिला. त्यांनी अंपायर म्हणून काम करायला सुरुवात केली. इंग्लडमध्येही हीच प्रथा आहे. अंपायर म्हणून निवडून आल्यावर पक्षाचा राजीनामा दिला जातो. परंतु, आपल्याकडे कोणीही राजीनामा देत नाही. तो पक्षाचा सदस्य राहतो. त्यामुळे तो पक्षाच्या दबावाखाली असतो.”

हेही वाचा >> “अजितदादा माझ्यावेळेला चांगले होते, पण…”, नाराजी नाट्यावर उद्धव ठाकरेंचा टोला; म्हणाले, “ज्यांच्या उरावर…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

१६ आमदार अपात्रतेचं प्रकरण राहुल नार्वेकरांच्या दरबारी प्रलंबित आहे. या प्रकरणी निकाल लागण्यासाठी किती कालावधी लागणे अपेक्षित आहे, असा प्रश्न उल्हास बापट यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले की, “माझ्यासारखा कार्यक्षम स्पीकर किंवा निवडणूक अधिकारी असेल तर दोन महिन्यांत ही सुनावणी संपायला पाहिजे. आता चार-पाच महिने गेले आणि अजून तीन महिने नार्वेकर मागत आहेत, सात महिने जर इतका क्षुल्लक निर्णय घ्यायला लागत असतील तर ती एकतर अकार्यक्षमता आहे किंवा ते पक्षाच्या दबावाखाली आहे. यापैकी एक कोणतंतरी कारण असू शकतं”, असं स्पष्ट मत त्यांनी आज नमूद केलं.