निर्यातीच्या प्रमाणात वाढ; ५९ मेट्रिक टन मध परदेशी

पुणे : गेल्या काही वर्षांमध्ये देशातून मधाच्या निर्यातीचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे. २०२०-२१ मध्ये देशातून ५९ हजार ९९९ मेट्रिक टन मधाची निर्यात करण्यात आली असून, जगभरातील पन्नास देशांमध्ये मधाची निर्यात करण्यात आली आहे. त्यात अमेरिके त सर्वाधिक निर्यात होते.

केंद्र सरकारने देशातील मध उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासह मधाच्या उत्पादनाच्या वाढीकडे विशेष लक्ष दिले. त्यामुळे गेल्या काही वर्षांत देशातील मधाच्या उत्पादनात आणि निर्यातीमध्येही वाढ होऊ लागली आहे.

मधाच्या निर्यातीच्या आकडेवारीचा आढावा घेतल्यास, (पान ४ वर) (पान १ वरून) २०१३-१४ मध्ये २८ हजार ३७८.४२ मेट्रिक टन मधाची निर्यात झाली होती. २०२०-२१मध्ये ५९ हजार ९८५ मेट्रिक टन मध निर्यात करण्यात आला त्यातून ९६.७७ दशलक्ष अमेरिकन डॉलरचे (७१६ कोटी) उत्पन्न देशाला मिळाले. अमेरिका, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, बांगलादेश, युरोपातील देश अशा एकू ण ५० देशांमध्ये मधाची निर्यात करण्यात आली. त्यातही भारतातील मध अमेरिके त मोठय़ा प्रमाणात निर्यात होत असल्याची माहिती कृषी आणि अन्न प्रक्रिया उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणाच्या (एपिडा) संके तस्थळावर देण्यात आली आहे. आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत राष्ट्रीय मधमाशी पालन आणि मधमोहीम या योजना पुढील दोन वर्षे अभियान म्हणून राबवण्यात येणार आहेत.

वाढ किती? २०१३-१४ मध्ये मधाचे उत्पादन ७६ हजार १५० मेट्रिक टन होते. २०१९-२० मध्ये त्यात वाढ होऊन ते १ लाख २० हजार मेट्रिक टनांवर गेले आहे.

वाढ का? मधुक्रांती किं वा राष्ट्रीय मधमाशी पालन आणि मधमोहीम ही योजना २०१७-१८ मध्ये सुरुवात झाली. या योजनेमध्ये मधमाशी पालनाचे प्रशिक्षण देऊन मधमाशांच्या वसाहती (बी कॉलनी) मध उत्पादकांना पुरवल्या जातात.

थोडी माहिती.. बाजारपेठेत दहा ते पंधरा प्रकारचे मध मिळतात. त्यात मस्टर्ड हनी, मल्टीफ्लोरा हनी, सूर्यफू ल, हर्बल असे काही प्रकार आहेत. गेल्या काही वर्षांत मस्टर्ड हनीच्या उत्पादनात वाढ झाली आहे. स्थानिक बाजारपेठेसह परदेशात मल्टीफ्लोरा हनीला मोठी मागणी आहे.

स्थानिक मागणीतही वाढ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्थानिक बाजारपेठेतही मधाच्या मागणीत सातत्याने वाढ होत आहे. मध रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतो. मधाच्या आरोग्य उपयुक्ततेबाबत आयुष मंत्रालयाने माहिती प्रसिद्ध के ली आहे. त्यामुळे करोना काळात मधाला मागणी आहे. मधाची निर्यात येत्या काळात वाढत राहणार असल्याचे मध उत्पादक प्रशांत सावंत यांनी सांगितले.