पंढरपूर : पंढरीत येणाऱ्या भाविकांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देणार आहे. संत निळोबाराय यांच्या पालखी सोहळ्यात पायी चालण्याचे भाग्य मिळाले. यातून जो आनंद मिळाला तो शब्दात वर्णन करता येणार नाही असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. त्यांनी आषाढी यात्रेच्या नियोजनाची पाहणी करून प्रशासनास सूचना दिल्या.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूरचा दौरा केला. पंढरपूर जवळ असलेल्या करकंब येथे संत निळोबाराय यांची पालखी आली होती. या पालखी सोहळ्यात मुख्यमंत्री शिंदे, मंत्री गिरीश महाजन, दादा भूसे हे देखील काही अंतर पायी चालले. हातात टाळ आणि मुखी हरी नाम करत पायी चालले. या वेळी भाविकांनी देखील मोठ्या उत्साहात सहभागी झाले.

हेही वाचा : IAS Pooja Khedkar Family ties Pankaja Munde : आयएएस पूजा खेडकर यांच्या कुटुंबियांचे पंकजा मुंडेंशी संबंध? १२ लाखांचा धनादेश…

त्यानंतर मुख्यमंत्री यांनी चंद्रभागा नदीच्या पैलतीरावरील ६५ एकर जागेची पाहणी केली. या ठिकाणी अनेक भाविक मुक्कामी आहेत. त्यांच्या राहूटी , पिण्याचे पाणी आदी व्यवस्थेची पाहणी केली. तसेच त्यांनी चंद्रभागा नदीच्या पात्रात पाय धुऊन पवित्र तीर्थ मस्तकी लावले. या नंतर त्यांनी वाळवंट , दर्शन रांग यांची पाहणी केली. दर्शन रांगेतील भाविकांशी संवाद साधत काही अडचण आहे का ? असे विचारल्यावर भाविकांनी उत्तम सोय केली असून तुमचे आभार असे म्हणत रांगेतील भाविकांनी विठ्ठल विठ्ठल चा जयघोष केला. या वेळी त्यांनी प्रशासनाला काही सूचना व बदल सांगितले. असे असले तरी मुख्यमंत्री यांची पायी वारी चालण्याची इच्छा पूर्ण झाली .

हेही वाचा : वाळवा, शिराळ्यात भाजपच – आ. खोत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुख्यमंत्री यांनी केली बुलेट स्वारी

मुख्यमंत्री शिंदे यांनी पंढरपूर शहरात चक्क बुलेट वरून फिरले. आमदार समाधान आवाडे यांनी सारथ्य केले. पावसाच्या रिमझिम पडत असताना आणि भाविकांची गर्दी पाहता बुलेट वरून फिरल्याने चर्चा होत आहे