सांगली : समाज कल्याण विभागाच्यावतीने बांधण्यात आलेल्या मुला-मुलींच्या वसतिगृहाचे उद्घाटन राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते रविवारी होणार असल्याची माहिती आ. सुरेश खाडे यांनी शुक्रवारी पत्रकार बैठकीत दिली.

यावेळी ते म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीचे औचित्य साधून प्रत्येक तालुक्यासाठी वसतिगृह मंजूर करण्यात आले. यामध्ये मिरज येथे १०० विद्यार्थ्यांसाठी आणि १०० विद्यार्थिनींसाठी दोन वसतिगृहे उभारण्यात आली आहेत. यासाठी शासनाने २५ कोटींचा निधी खर्च केला आहे. याचे लोकार्पण रविवारी मंत्री शिरसाट यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तसेच योगीनगर येथे दोन कोटी रुपये खर्च करून लुंबिनी बौद्ध विहार व ग्रंथालय उभारण्यात आले असून, त्याचेही उद्घाटन या वेळी करण्यात येणार आहे.

आ. खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉन स्पर्धा, लाडू वाटप, वृद्धाश्रम व अनाथाश्रमात फळ वाटप आदी कार्यक्रमांचे आयोजन कार्यकर्त्यांनी केले असल्याचेही यावेळी भाजपचे मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख काकासाहेब धामणे यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज्याच्या अंदाजपत्रकात मिरज विधानसभा मतदार संघातील विकासकामांना निधी मिळाला नसला तरी येत्या पावसाळी अधिवेशनात निश्चितपणे निधी मिळेल, असा विश्वास माजी पालकमंत्री आ. सुरेश खाडे यांनी शुक्रवारी पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त केला. लाडक्या बहिणींसाठी अन्य खात्याचा निधी वळविण्यात आल्याच्या आरोपाचा त्यांनी यावेळी इन्कार केला.