scorecardresearch

Premium

सांगली : रानवस्तीवरुन गायी चोरणाऱ्या टोळीला अटक

बेडग परिसरात चोरीस गेलेल्या सहा दुभत्या गायी हस्तगत करण्यात यश आले आहे.

sangli cow theft news in marathi, sangli cow thief arrested, cow thief arrested in sangli
सांगली : रानवस्तीवरुन गायी चोरणाऱ्या टोळीला अटक (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

सांगली : रानवस्तीवर गोठ्यात बांधलेल्या संकरित गायींची चोरी करणारी सहा जणांची टोळी मिरज ग्रामीण पोलीसांनी गजाआड केली असून त्यांच्याकडून बेडग परिसरात चोरीस गेलेल्या सहा दुभत्या गायी हस्तगत करण्यात यश आले आहे. ही माहिती पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी शनिवारी पत्रकार बैठकीत दिली.

दिवाळी नंतर बेडग, आरग, मालगाव परिसरातील रानवस्तीवर गोठ्यातून संकरित दुभत्या गायींची चोरी होत असल्याच्या तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल झाल्या होत्या. या चोरीचा तपास करीत असताना गुन्हे प्रगटीकरण शाखेच्या कर्मचार्‍यांना या गायींची चोरी करून कमी किंमतीत या गायींची विक्री नरवाड, सांगोला, कर्नाटकातील सीमावर्ती गावात केली जात असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पडताळणी केली असता म्हैसाळमध्ये संकरित गाय नव्याने खरेदी केली असल्याची माहिती पोलीसांना मिळाली. या गायीच्या खरेदीबाबत चौकशी केली असता या चोरीचा उलगडा झाला.

navi mumbai municipal corporation to open wetlands for residential complexes zws
पाणथळ जमिनींवर निवासी संकुले! नवी मुंबईत पामबीचलगत फ्लेमिंगो अधिवास धोक्यात
man killed in tiger attack near ballarpur city
वाघाने पतीसमोरच घेतला पत्नीच्या नरडीचा घोट, बकऱ्या चारण्यासाठी गेलेल्या…
Stock of adulterated betel nuts worth Rs 3 crore seized illegal transportation in 11 trucks
भेसळयुक्त सुपारींचा तीन कोटी रुपयांचा साठा जप्त, ११ मालमोटारींमधून अवैध वाहतूक
vasai chain snatcher marathi news, vasai police recruitment exam marathi news
वसई : बनायला गेला पोलीस, पण बनला चोर

हेही वाचा : “हमारे दुःख पर मीठ क्यूँ चोळते हो?” म्हणत छगन भुजबळांनी केली मनोज जरांगे पाटील यांची नक्कल

या प्रकरणी प्रतिक कोळी (वय २१, बेडग), राकेश शिंदे (वय २४, म्हैसाळ), आकाश उर्फ बापू मासाळ (वय २३, बेडग), प्रकाश उर्फ बापान्ना मासाळ (वय २४, बेडग), किशोर उर्फ अण्णा शेळके (वय २३, बेडग) आणि राकेश आवळे (वय ३१, म्हैसाळ) या सहा जणांना पोलीसांनी अटक केली असून त्यांच्याकडून चोरीस गेलेल्या सहा संकरित दुभत्या गायी, वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला लहान टेम्पो (एमएच १० सीआर ०५८२) हस्तगत करण्यात आला आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: In sangli gang who stole cows arrested by the police css

First published on: 09-12-2023 at 17:48 IST

आजचा ई-पेपर : महाराष्ट्र

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×