नफा वाटणीच्या मुद्द्यावरून प्राथमिक शिक्षक बँकेच्या वार्षिक सभेमध्ये सोमवारी गदारोळ माजला. हक्काचा लाभांशातील १  कोटी ७० लाख रूपये इमारत फंडासाठी वर्ग करण्याला विरोधकांचा विरोध होता. फलक दर्शवत विरोध होत असतानाही विषय पत्रिकेवरील सर्व विषय मंजूर करण्यात आल्याची घोषणा अध्यक्ष विनायक शिंदे यांनी केली. दरवर्षी गदारोळामुळे शिक्षक बँकेची वार्षिक सभा गाजत असते. दोन महिन्यांपूर्वी सत्तांतर होउन बारा शिक्षक संघटनांच्या पाठिंब्यामुळे बँकेत स्वाभिमानी पॅनेल सत्तारूढ झाल्यानंतरची हि पहिलीच सभा होती. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन उपाध्यक्ष अनिता काटे यांच्या हस्ते करण्यात आले. सभा वादळी होण्याच्या शययतेमुळे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

सभेला सुरूवात होण्यापुर्वीच सत्ताधारी गटाचे शिक्षक सभासद सभागृहामध्ये पुढील बाजूस स्थानापन्न झाले होते. यामुळे विरोधकांना मागील बाजूस उभा राहण्याचाच पर्याय शिल्लक होता. सभेपूर्वीच घोषणा-प्रतिघोषणांनी सभागृह दणादूण गेले. सभा सुरू होताच मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब कोले यांनी विषय पत्रिकेचे वाचन केले. अध्यक्ष शिंदे यांनी विषयपत्रिकेवरील विषयांचे वाचन करताच सभागृहातील सभासदांकडून मंजूर-नामंजूरच्या घोषणा देण्यात येत होत्या. अध्यक्षांनी सभासदांनी उपस्थित केलेल्या काही सूचनांचाही चर्चा यावेळी केली.
दरम्यान,  सत्ताधारी गटाने दबावाने सर्व विषय मंजूर केल्याचा आरोप माजी अध्यक्ष उत्तमराव जाधव यांनी केला.

हेही वाचा : अलिबागच्या मोरबे धरणात दोन मृतदेह आढळले ; अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नफ्यातील मोठा हिस्सा प्राप्तीकर विभागाकडे वर्ग करण्यात आला असून त्याची गरज नव्हती. तसेच हक्काचा लाभांश इमारत निधीसाठी वर्ग करण्यात आल्याने सभासदांवर अन्याय करण्यात आल्याचा आरोप यावेळी शशिकांत भजबळे, रमेश पाटील, महादेव माळी आदींनी केला. तर विरोधी गटाचे एकमेव संचालक कृष्णात पोळ यांनी नफा वर्ग करण्यास आपण लेखी विरोध नोंदवला असल्याचे सांगितले. अध्यक्ष शिंदे यांनी सभा खेळीमेळीत व शांततेत पार पडली व सर्व विषय मंजूर झाल्याचा दावा केला.