सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील कोलगाव येथे नागपंचमीच्या पवित्र दिवशी एक अविस्मरणीय घटना घडली. एरवी नागपंचमीला सर्वजण घरात नागाची प्रतिमा किंवा मूर्ती पूजतात, पण आज मंगळवारी रघुनाथ कोरगावकर यांच्या घरात चक्क खऱ्या नागराजांनी दर्शन दिले. या अनपेक्षित आगमनाने कोरगावकर कुटुंबाला सुखद धक्का बसला.

नागराजानी घराच्या मागच्या बाजूने प्रवेश करत थेट पायरीवरून घरात आगमन केले. नागपंचमीच्या दिवशीच साक्षात नागराजांचे दर्शन होणे हे अत्यंत दुर्लभ आणि भाग्याचे लक्षण मानले जाते. कोरगावकर कुटुंबियांनी या नागराजांचे यथोचित पूजन केले. ही घटना कोलगावात चर्चेचा विषय ठरली असून, नागपंचमीच्या दिवशी नागदेवाचे असे प्रत्यक्ष दर्शन झाल्याने भाविकांमध्ये आश्चर्य आणि श्रद्धेची भावना आहे.