सोलापूर : सोलापूरलगत कर्नाटक सीमेवरील विजापूर जिल्ह्यातील लच्याण येथे शेतात खोदलेल्या कूपनलिकेत पडलेल्या एका दोन वर्षांच्या मुलाला शासनाच्या बचाव कार्य पथकाने २० तासांच्या आथक प्रयत्नांनंतर अखेर सुखरूपपणे बाहेर काढले. बालकाचा जीव बचावला असून त्यास पुढील उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सोलापूरपासून सुमारे ५५ किलोमीटर अंतरावर लच्याण (ता. इंडी) येथे दुष्काळी संकटात पाणीटंचाईमुळे शेतातील पिके धोक्यात आली आहेत. पिण्याच्या पाण्याचीही टंचाई भासत आहे. त्यावर मात करण्यासाठी शेतकरी आपापल्या शेतात कुपनलिका खोदत आहेत.

हेही वाचा : “निवडणुकीत ‘त्यांचे’ व्हेंटिलेटरही काढतील”, नाना पटोलेंचे वादग्रस्त वक्तव्य; नवा वाद पेटण्याची चिन्हे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लच्याण येथील मुजगोंड या शेतकरी कुटुंबीयांनी शेतात पाणी टंचाई दूर करण्यासाठी नुकतीच कूपनलिका खोदली होती. परंतु खोलपर्यंत खोदलेली कूपनलिका न झाकता तशीच उघडी ठेवण्यात आली होती, मुजगोंड कुटुंबीयांतील सात्विक नावाचा दोन वर्षांचा मुलगा शेतातील वस्तीवर खेळता खेळता उघड्या कूपनलिकेजवळ गेला. तेथे अन्य कोणीही नव्हते. खेळताना सात्विक कूपनलिकेत पडला. नंतर हा प्रकार मुजगोंड कुटुंबीयांच्या निदर्शनास येताच धावपळ सुरू झाली. कलबुर्गी आणि बेळगाव येथून निमलष्करी बचाव फथकाला पाचारण करण्यात आले होते. या पथकाने २० तासांच्या अथक बचाव कार्यानंतर अखेर कूपनलिकेतून सात्विकला सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश मिळविले. कूपनलिकेत अडकून पडलेल्या सात्विकच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॕमे-यांची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच सात्विक याचे प्राण वाचविण्यासाठी खोल कूपनलिकेत कृत्रिम प्राणवायू पुरवठा करणारी नलिका सोडण्यात आली होती.