सोलापूर : शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे हे आणखी एका गुन्ह्यात अडकले आहेत. आपल्या कार्यालयाजवळ ग्राहकांच्या दुचाकी लावण्याच्या कारणावरून एका हाॅटेलच्या व्यवस्थापकाला शिवीगाळ व मारहाण करून हाॅटेल जाळून टाकण्याची धमकी देऊन त्याचा मोबाईल संच हिसकावून नेल्याच्या आरोपावरून काळजे व त्यांच्या वाहनचालकाविरूध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. काल रात्री शहरात सात रस्त्यावर हा प्रकार घडला.

यासंदर्भात स्टार हाॅटेलचे व्यवस्थापक वसीम अ. गफार पेशइमाम यांनी सदर बझार पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार सात रस्त्यावर हाॅटेल स्टारच्या पाठीमागे मनीष काळजे यांचे कार्यालय आहे. तेथे येण्याजाण्यासाठी डाव्या बाजूने स्वतंत्र रस्ता आहे. रात्री त्यांच्या कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर कोणी तरी अज्ञात व्यक्तीने दुचाकी लावली होती. ते पाहून मनीष काळजे व त्यांचा वाहनचालक दोघे स्टार हाॅटेलमध्ये येऊन व्यवस्थापक पेशइमाम यांना, तुमच्या ग्राहकांच्या दुचाकी गाड्या माझ्या कार्यालयासमोर का लावता, असे म्हणत शिवीगाळ करून मारहाण केली. हाॅटेलमधील एका कामगाराने पेशइमाम यांच्या मोबाईलने या घटनेचे चित्रिकरण केले असता काळजे यांनी पुन्हा चिडून शिवीगाळ व मारहाण करीत २२ हजार रूपये किंमतीचा मोबाईल बळजबरीने हिसकावून नेला. काळजे यांनी हाॅटेल कसे चालवता ते बघतो, हाॅटेल जाळून टाकतो, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Santosh Parab attack case,
संतोष परब हल्ला प्रकरण : नितेश राणे यांना मंजूर जामीन रद्द करा, राज्य सरकारच्या याचिकेवर उच्च न्यायालयाची राणे यांना नोटीस
Ram Navami, High Court, State Govt,
रामनवमीला खबरदारी घ्या! उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश
eknath shinde
महायुतीच्या सर्व जागा बहुमताने निवडून येणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा, म्हणाले ‘शेतकऱ्यांना मदत…’
Rashmi Barve
रश्मी बर्वे प्रकरणावर बुधवारी सुनावणी, जातवैधता प्रमाणपत्रामुळे निवडणूक अर्ज रद्द

हेही वाचा : शिवतारे गरजले, “बारामतीमधून पवार यांची हुकूमशाही संपविण्यासाठीचे माझे धर्मयुद्ध..”

मनीष काळजे यांच्यावर गेल्या महिन्यात चार लाख रूपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. यापूर्वी काही गुन्ह्यांची नोंद त्यांच्या नावावर आहे. पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी दोनपेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेल्या गावगुंडांसह नागरिकांना त्रास देऊन कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या संशयित गुन्हेगारांविरूध्द तडीपारीसह महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, अवैध व्यवसाय करण्यास प्रतिबंध कायद्याखाली (एमपीडीए) एक वर्षासाठी स्थानबध्दतेची कारवाई हाती घेतली आहे. यात तथाकथित राजकीय पुढाऱ्यांनाही त्यांची जागा दाखविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर मनीष काळजे यांची गुन्हे विषयक नोंदीची पार्श्वभूमी पाहता त्यांच्या विरूध्द पोलीस प्रशासन कोणती प्रतिबंधात्मक कारवाई करतात, याकडे नागरिकांचे लक्ष वेधले आहे.