कांदा निर्यात शुल्क वाढीवरून देशभरात संताप व्यक्त केला जात आहे. यावरून अनेक बाजार समित्यांमध्ये कांद्याचा लिलाव बंद करण्यात आला होता. परिणामी भारतात कांद्याचे दर गगनाला भिडले होते. यावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. ते साताऱ्यातील दहीवाडी येथे बोलत होते.

“जे शेतकऱ्यांविरोधात निर्णय घेतात, आम्ही त्यांच्या विरोधात आहोत, असं शरद पवार म्हणाले. तसंच, शेतीमालावर कोणतंही बंधन नको. यापूर्वी कधीच कांदा निर्यातीवर कर लादण्यात आला नव्हता”, असंही शरद पवार म्हणाले.

हेही वाचा >> Video: “अजित पवार आमचे नेते”, या शरद पवारांच्या वक्तव्यावर काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

“जो कष्टकरी शेतकऱ्याच्या आड येतो, त्याला आमची साथ नाही. त्याला आमचा पाठिंबा नाही. आणि कोणी धोरणं आखली तर, ही धोरणं बदलून घेण्यासाठी तुमच्या सर्वांची सामूहिक शक्ती वापरून एकमताचं वचन या हिंदुस्थानात तयार केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही”, असं शरद पवार म्हणाले.

हेही वाचा >> “काही ठराविक लोकांनी टार्गेट करून…”, सत्यजित तांबेंचं मोठं विधान; काँग्रेसच्या कोणत्या नेत्यांवर रोख?

मणिपूर प्रकरणावरूनही हल्लाबोल

गेले दोन-अडीच महिने माणसा-माणसामध्ये संघर्ष सुरू आहे. राज्या-राज्यामध्ये संघर्ष वाढला आहे. तेथे जाऊन परिस्थिती शांत करणे, ही देशाच्या नेतृत्वाची जबाबदारी आहे. पंतप्रधानांंनी मणिपूरमध्ये जायला हवं. लोकशाहीत काहींनी जे निर्णय घेतले, त्यावर मी बोलणार नाही. पण लोकांनी कोणाच्या विरोधात मत दिलं आहे, याचा विचार करावा लागेल, असंही शरद पवार म्हणाले.