कामगार कल्याणकारी मंडळातर्फे लाभ वाटप करतांना तत्कालीन कामगार अधिकाऱ्याने 5 कोटी 79 लाख रुपयांचा अपहार केल्या प्रकरणी पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे विद्यमान कामगार अधिकारी कौस्तुभ भगत यांनी आता रामनगर पोलिसांकडे या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे, मे 2020 ते सप्टेंबर 2020 दरम्यान हा घोळ झाला आहे, दाखल तक्रारीत तत्कालीन कामगार अधिकारी पी डी चव्हाण यांनी इमारत व इतर बांधकाम मंडळामार्फत 18 हजार 128 कामगारांना 23 कोटी 5 लाख 65 हजार रुपयांचे वाटप केले होते, कामगार आयुक्त कार्यालयाच्या चौकशी समितीने केलेल्या चौकशीत प्रत्यक्षात 10 हजार 318 एवढेच अर्ज उपलब्ध असल्याचे दिसून आले, 6 हजार183 अर्ज प्राप्तच नव्हते, प्राप्त न झालेल्या अर्जापैयकी 4 हजार 281 अर्जाचे आर टी जि स मार्फत 5 कोटी 79 लाख 9 हजार रुपयांचे वाटप झाल्याचे तपासातून आढळून आले, हा अपहार कामगार अधिकारी,कर्मचारी व इतरांनी मिळून केल्याची तक्रार आहे,,विविध 6 कलमाखाली गुन्हे दाखल करण्यात आले असल्याचे रामनगर पोलिसांनी सांगितले
संग्रहित लेख, दिनांक 25th Apr 2021 रोजी प्रकाशित
लाभ वाटप करतांना माजी कामगार अधिकाऱ्याकडून 5 कोटींचा अपहार ?
अपहार कामगार अधिकारी,कर्मचारी व इतरांनी मिळून केल्याची तक्रार आहे
Written by प्रशांत देशमुख
Updated:

First published on: 25-04-2021 at 23:42 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Incumbent labor officer kaustubh bhagat embezzling rs 5 crore 79 lakh akp