आळंदी: संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा चार दिवसांवर येऊन ठेपला आहे. तरी देखील आळंदीमधील इंद्रायणी नदी अस्वच्छ असल्याचं चित्र आहे. इंद्रायणी नदीत फेस आल्याचं पुन्हा एकदा पाहायला मिळालं आहे. यामुळे पालखी सोहळ्यासाठी आळंदीत दाखल होणाऱ्या लाखो वारकऱ्यांचं आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

११ जून रोजी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. लाखो वारकरी आळंदीत दाखल होत आहेत. असं असताना इंद्रायणी नदी मात्र फेसाळलेल्या अवस्थेत आहे. लाखो वारकरी याच इंद्रायणी नदीत पवित्र स्नान करतात त्यामुळे पालखी सोहळ्यासाठी येणाऱ्या वारकऱ्यांचं आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. इंद्रायणी नदी अत्यंत दुर्गंधीयुक्त आणि रसायनयुक्त झाली आहे. एखादा बर्फाळ प्रदेशात तर नाही ना? अशी प्रचिती नदी पाहिल्यानंतर येते. पांढरे शुभ्र बर्फासारखे गोळे नदीच्या पाण्यावर तरंगत आहेत.

आणखी वाचा-वाई: संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाची पोलीस महानिरीक्षकांकडून पाहणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इंद्रायणी नदीत केमिकलयुक्त पाणी सोडण्यात आल्याने नदीची अवस्था झाल्याच स्थानिक नागरिकांनी आरोप केला आहे. या अगोदर देखील अनेकदा इंद्रायणी नदी फेसाळल्याचं पाहायला मिळाले आहे. वारकऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आल्याने याकडे संबंधित प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.