मराठा आरक्षणाचे अभ्यासक बाळासाहेब सराटे यांच्यावर मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी शाई फेकली. सराटे यांच्या संस्थेला सर्वेक्षणाचे काम दिल्याने मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते नाराज होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठा समाजाची सामाजिक आणि आर्थिक स्थिती जाणून घेण्याचे काम सुरु आहे. यासाठी राज्यातील मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष न्या. एम. जी. गायकवाड हे सध्या औरंगाबादमध्ये आहेत. शुक्रवारी सुभेदारी सभागृहात ते समाजातील विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेत होते. यादरम्यान, मराठा क्रांती मोर्चाचे काही कार्यकर्ते तिथे पोहोचले. त्यांनी मराठा आरक्षणाचे अभ्यासक बाळासाहेब सराटे यांना गाठले आणि त्यांच्यावर शाई फेकली. तिथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला आणि क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांना रोखले. सराटे हे संघाचे समर्थक असून ते मराठा आरक्षणाविरोधात काम करत असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे. कार्यकर्त्यांनी सराटे यांना शिवीगाळही केली. पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ink thrown at researcher of maratha issues balasaheb sarate in aurangabad by maratha kranti morcha supporters
First published on: 16-03-2018 at 13:27 IST