वीर सावरकर यांच्याविषयी माझ्या मनातही आदर होता. मात्र मी ‘सहा सोनेरी पानं’ हे पुस्तक वाचलं आणि माझं मत बदललं असं काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता नवा वाद सुरू होण्याची शक्यता आहे. राहुल गांधी यांचं लोकसभेचं सदस्यत्व गेल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्या पत्रकार परिषदेत वीर सावरकर यांचा उल्लेख माफीवीर असा केला होता. तसंच माझं आडनाव गांधी आहे सावरकर नाही मी माफी मागणार नाही असं म्हटलं होतं. त्यानंतर बराच मोठा वाद झाला होता. आता प्रणिती शिंदे यांनी केलेलं वक्तव्य वाद निर्माण करू शकतं.

काय म्हटलं आहे प्रणिती शिंदे यांनी?

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या ‘सहा सोनेरी पाने’ या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि आणि महिलांचा अपमान करण्यात आला आहे. सोलापूरच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी पत्रकार परिषदेत याबद्दलचं विधान केलं आहे. दरम्यान, महिनाभरापूर्वी राहुल गांधींनी सावरकरांबद्दल केलेल्या विधानाने एकच वादंग निर्माण झाला होता. तर भाजपाने आक्रमक होत आंदोलनही पुकारलं होतं. आता प्रणिती शिंदे यांच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा वादाला तोंड फुटण्याची चिन्हं आहेत.

uddhav balasaheb thackeray criticized mahayuti candidate sandipan bhumre
मद्य परवान्यांचा विषय ठाकरे गटाकडून ऐरणीवर; उमेदवारी जाहीर होताच भुमरे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न
bjp mp ramdas tadas
“मला लोखंडी रॉडने मारलं, माझ्यावर…”, भाजपा खासदार रामदास तडस यांच्या सुनेचे गंभीर आरोप
Ramdas Athawale, raj thackeray
“महायुतीला राज ठाकरेंच्या पाठिंब्याची गरज नव्हती, मात्र…”, रामदास आठवले यांची प्रतिक्रिया; म्हणाले…
Vijay Wadettiwar On Raj Thackeray
“राज ठाकरे हा वाघ माणूस, पण त्यांचा कोल्हा करण्याचा प्रयत्न”; विजय वडेट्टीवार यांचा टोला