मालेगाव – देशविघातक कारवाया आणि समाजात अशांतता निर्माण करण्यास कारणीभूत असल्याचा ठपका ठेवत केंद्र शासनाने बंदी घातलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेशी संबंधित असल्याच्या संशयावरून राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) मालेगावातील गुफरान खान याची पाच तासांहून अधिक वेळ चौकशी केली.

गुफरान याचे शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोमीनपुरा भागात वास्तव्य आहे. त्याचा शिवणकामाचा व्यवसाय आहे. रविवारी पहाटे ‘एनआयए’च्या पथकाने त्याच्या घरावर छापा टाकला. पथकाने त्याला ताब्यात घेत शहर पोलीस ठाण्यात नेले. तेथे पाच तासांहून अधिक वेळ त्याची चौकशी करण्यात आली. चौकशीनंतर पथकाने त्याला नोटीस देऊन सोडून दिले. सोमवारी मुंबईतील कार्यालयात हजर रहाण्याविषयी ‘एनआयए’च्या वतीने त्याला सांगण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून समजली आहे.

हेही वाचा – “…तर आम्ही कधीही सहन करणार नाही”, शरद पवार-अजित पवार भेटीवरून नाना पटोलेंचा सूचक इशारा

हेही वाचा – अजित पवारांसोबत दररोज भांडायलाच हवे काय? कौटुंबिक संबंध थोडेच संपणार आहेत – रोहित पवार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नोव्हेंबर महिन्यात तपास यंत्रणांनी महाराष्ट्रासह अन्य राज्यांत छापेमारी केली होती. त्यात पीएफआयशी संबंधित अनेक कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती. त्यात मालेगाव शहरातील तिघांचा समावेश होता. आता पीएफआयशी संबंधित म्हणून येथील एकाची पुन्हा चौकशी सुरू झाली असल्याने तो चर्चेचा विषय झाला आहे.