राज्यात करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे दररोज मोठ्याप्रमाणात करोनाबाधित आढळून येत आहेत. परिणामी आरोग्य यंत्रणा कोलमडत असून, औषधांसह वैद्यकीय उपकरणांचा तुटवडा निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून वेळोवेळी केंद्र सरकारकडे मदतीची मागणी करण्यात येत आहे. तर, केंद्र सरकारनेही आतापर्यंत राज्याला आवश्यक असलेल्या विविध बाबींचा पुरवठा केलेला आहे. याच पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेला मोदी सरकारकडून ६० व्हेंटिलेटर पाठण्यात आले होते. मात्र ते कनेक्टरशिवाय असल्याचे आढळून आल्याने, यावरून आता काँगेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“मोदी सरकारने पीएम केअर फंडच्या मधून १० दिवसांपूर्वी नाशिक महापालिकेला ६० व्हेंटिलेटर पाठवले. परंतु ते कनेक्टरशिवाय पाठविल्याने वापरलेच गेले नाहीत. व्हेंटिलेटरची तीव्र निकड असताना असा हलगर्जीपणा अपेक्षित आहे का? मोदी सरकारच्या योजना कौशल्य व व्यवस्थापनाचे कौतुक करावे तेवढे कमी!” असं ट्विट करत, सचिन सावंत यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

…हा मोदी सरकारचा धूर्तपणा आहे; कृपया खोटं बोलणं थांबवा – सचिन सावंत

या अगोदर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारने राज्यांना केलेल्या ऑक्सिजन पुरवठ्यात सर्वाधिक ऑक्सिजन पुरवठा हा महाराष्ट्राला करण्यात आला असल्याचा दावा केला होता. यावरून आज काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आकडेवारी सादर करत फडणवीसांवर निशाणा साधला होता. हा मोदी सरकारचा धूर्तपणा आहे. कृपया खोटे बोलणे थांबवा. असं सावंत म्हणाले होते.

Corona Third Wave : आरोग्यमंत्री टोपेंकडून सर्व जिल्हाधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना, म्हणाले…

दरम्यान, राज्यात ऑगस्टच्या शेवटी किंवा सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात करोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. केंद्र सरकारच्या पातळीवर झालेल्या बैठकीतही या संदर्भात सूतोवाच झालेले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याची आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्तांना दिलेल्या असून, आज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील माध्यमांशी बोलाताना याबाबत विधान केलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Is such negligence expected when there is an acute need for a ventilator sachin sawant msr
First published on: 06-05-2021 at 18:57 IST