जालना – नव्याने बसविण्यात आलेल्या टीओडी (टाईम ऑफ डे) मीटरमध्ये फेरफार करून करून वीजचोरी केल्याच्या आरोपावरून शहरातील २२ जणांच्या विरुद्ध तक्रार केली पोलिसांनी गुन्हे नोंदविले आहेत. यासंदर्भात तीन ग्राहक आणि मीटरमध्ये फेरफार करून देणाऱ्या दोघांच्या विरुद्ध गुन्हे दाखल झालेले आहेत. त्यामुळे या प्रकरणात गुन्हे नोंदविण्यात आलेल्यांची संख्या २७ झाली आहे.

महावितरणचे सहाय्यक अभियंता सचिन उकंडे यांच्या फिर्यादीवरून सुवर्णकारनगर येथील पंडितअप्पा नामदे याच्या विरुद्ध मीटरमध्ये फेरफार करून १८ हजार ६५० रुपयाची वीजचोरी केल्याच्या आरोपावरून सदर बाजार पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याशिवाय मीटरमध्ये फेरफार करून देणाऱ्या अन्य दोघांच्या विरोधातही गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

दुसऱ्या एका प्रकरणात महावितरणच्या पथकाने चंदनाझिरा येथील साठ फुटी रस्त्यावर वीज मीटरची तपासणी केली. या पथकास १७ ग्राहकांनी मीटरमध्ये फेरफार करून वीजचोरी केल्याचे निदर्शनास आले. या १७ ग्राह‌कांच्या विरुद्ध महावितरण’ चे सहाय्यक अभियंता सचिन बनकर यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हे नोंदविले आहेत. या ग्राहकांनी शपथयत्रात दिलेल्या माहितीनुसार राज शेख आणि अन्य एका व्यक्तीने मीटरमध्ये फेरफार करून दिलेली आहे. त्यामुळे त्या दोघांच्या विरुद्धही पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. ‘टीओडी’ या आधुनिक मीटर मध्ये फेरफार केल्यास त्याची माहिती ‘ऑनलाईन’ कायलियात उपल्क उपलब्ध होते. त्यानंतर अशा ग्राहकांच्या वीजमीटरची प्रत्यक्ष तपासणी केली जाते, असे महावितरण’ च्या वतीने सांगण्यात आले.