जालना : जालना अतिरिक्त औद्योगिक वसाहतीमध्ये खंजीराचा धाक दाखवून लूटमार करणारी तिघा जणांची टोळी पोलिसांनी पकडली आहे.औद्योगिक वसाहतीत १७ जुलै रोजी एका कामगारास खंजीराचा धाक दाखवून मारहाण करून त्याच्या जवळील मोबाईल पळविण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी विशाल संतोष टाकळकर, विजय अशोक गायकवाड, संतोष सुनील आघाम या तिघांना अटक केली आहे. त्यांच्या जवळून मोबाईल, एक मोठा खंजीर आणि मोटारसायकल इत्यादी ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल चन्दनझिरा पोलिसांनी जप्त केला आहे.

त्याचप्रमाणे जुन्या औद्योगिक वसाहतीमधील पावरलूम भागात धारदार तलवार बाळगणाऱ्या प्रथमेश बालाजी कदम या युवकास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली . आरोपीकडून एक हजार रुपये किंमतीची तलवार पोलिसांनी जप्त केली आहे, तलवार घेऊन दहशत निर्माण करीत असल्याच्या आरोपावरून सदर बाजार पोलिसांनी यासंदर्भात गुन्हा नोंदविला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जालना शहरा जवळील खरपुडी गावाच्या परिसरात अशोक भानुदास भोपळे या व्यक्तीस जालना शहराजव‌ळील खरपुडी गावाच्या परिसरात पोलीसांनी अटक करून ४१ हजार २०० रुपयांचे एक गावठी पिस्टल त्याचप्रमाणे तीन जीवंत काडतुसे जप्त केली. आणखी एका प्रकरणात मित्राकडून तलवार आणून समाजमाध्यमावर चित्रफीत टाकणाऱ्या संभाजी सुभाष जऱ्हाड यास पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याचा.मित्र विशाल बाबासाहेब धोंगडे याच्याविरुध्दही गुन्हा नोंदविला आहे.