नगर : जामखेड नगरपालिकेचे मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांच्या विरोधात पालिका कर्मचारी संघटनेने केलेल्या तक्रारींची चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्यानंतर कर्मचारी संघटनेने गेले दोन दिवस सुरू केलेले आंदोलन मागे घेतले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जिल्हाधिकाऱ्यांतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयातील नगरपालिका विभागाचे प्रशासनाधिकारी प्रशांत खांडकेकर यांच्या लेखी आश्वासनाचे पत्र तहसीलदार योगेश चंद्रे यांनी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष डॉ. अरुण जाधव यांना दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेतले. या वेळी लोकाधिकार आंदोलनाचे प्रवक्ते बापूसाहेब ओहोळ, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष आतिश पारवे, आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष योगेश सदाफुले, शहराध्यक्ष अजिनाथ शिंदे, श्री शिवप्रतिष्ठानचे पांडुरंग भोसले, माजी नगरसेवक अमित चिंतामणी, अ‍ॅड. प्रवीण सानप, विशाल पवार, शिवकुमार डोंगरे, राम पवार आदी उपस्थित होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jamkhed municipal employees union agitation written assurance inquiry corporation chief collector ysh
First published on: 25-03-2022 at 00:46 IST