हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस आघाडीचे उमेदवार कल्लाप्पाण्णा आवाडे यांना जनसुराज्य शक्ती पक्षाने पाठिंबा दिल्याची माहिती जनसुराज्य पक्षाचे विजयसिंह जाधव यांनी दिली.
कोल्हापूर, सांगली जिल्हय़ात जनसुराज्यचे प्रभाव क्षेत्र असल्याने लोकसभा निवडणुकीत काय भूमिका घ्यायची यासंदर्भात आमदार विनय कोरे गेली आठ दिवस कार्यकर्त्यांशी चर्चा करीत होते. लोकसभा निवडणुकीसाठी जनसुराज्यने केवळ हातकणंगलेच्या जागेसाठी काँग्रेस आघाडीला पाठिंबा दिला असून अद्याप कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी कोणाला पाठिंबा द्यायचा याबाबत चार दिवसांत निर्णय घेण्याची शक्यता असल्याचे प्रवक्ते जाधव यांनी सांगितले. प्राथमिक टप्प्यात तिस-या आघाडीबाबत चर्चा झाल्याने तसेच कोल्हापूरच्या जागेसाठी जनसुराज्यने अद्याप पाठिंबा न दिल्याने शेकापला जनसुराज्यकडून पाठबळ मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
संग्रहित लेख, दिनांक 26th Mar 2014 रोजी प्रकाशित
कल्लाप्पाण्णा आवाडे यांना जनसुराज्य शक्ती पक्षाचा पाठिंबा
हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस आघाडीचे उमेदवार कल्लाप्पाण्णा आवाडे यांना जनसुराज्य शक्ती पक्षाने पाठिंबा दिल्याची माहिती जनसुराज्य पक्षाचे विजयसिंह जाधव यांनी दिली.

First published on: 26-03-2014 at 03:53 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jan surajya shakti party support to kallappanna awade