पंढरपूर : मतचोरीच्या नावाखाली सरकारविरोधात मोर्चा काढणाऱ्यांची यांची मती चोरीला गेली आहे. आपल्याला मते का मिळत नाहीत, लोक का नाकारतात याचे परीक्षण करण्याऐवजी अशा खोट्या गोष्टींनी लक्ष वळवण्याचा हा प्रकार आहे. आरोप करणाऱ्यांनी अगोदर रोज जनतेत जावे. कधी तरी उठून असे आरोप, मोर्चापुरते राजकारण करू नये, असा आरोप ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी येथे बोलताना केला.
दरम्यान, फलटणमधील आत्महत्या केलेल्या डॉक्टर भगिनीचा आदर करतो. पोलिसांना या घटनेचा तपास करू द्यावा. मात्र, दुर्दैवाने याचे राजकारण केले जात असल्याचेही गोरे या वेळी म्हणाले. जे या घटनेशी संबंधित असतील, त्यांना शिक्षा होईल. डॉक्टर भगिनीस न्याय मिळेल. मात्र, दुर्दैवाने या घटनेतही विरोधकांकडून राजकारण केले जात असल्याचेही गोरे या वेळी म्हणाले.
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी बहुतेक दोन महिन्यांसाठी खोटे बोलायचे नाही, असे ठरवले आहे. त्यामुळे त्यांनी दोन महिने अलिप्त राहण्याचे मौन व्रत धारण केले आहे, असाही राजकीय चिमटा गोरे यांनी राऊत यांना लगावला.
पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी कार्तिकी यात्रेची तयारी आणि आढावा घेतला. यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, की विधानसभा निवडणुकीत या सर्व विरोधकांना जनतेने साफ नाकारले. परंतु हा पराभव आणि जनता आपल्याला स्वीकारत नाही हे त्यांच्या अजून पचनी पडत नाही. मते मिळण्यासाठी जनतेत जावे लागते. त्यांच्या सुखदु:खात सहभागी व्हावे लागते. केवळ निवडणुका आल्यावर जागे होणाऱ्यांच्या आरोपाला फार किंमत देऊ नये.
दरम्यान, फलटणमधील आत्महत्या केलेल्या डॉक्टर भगिनीचा आदर करतो. पोलिसांना या घटनेचा तपास करू द्यावा. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. जे या घटनेशी संबंधित असतील, त्यांना शिक्षा होईल. डॉक्टर भगिनीस न्याय मिळेल. मात्र, दुर्दैवाने या घटनेतही विरोधकांकडून राजकारण केले जात असल्याचेही गोरे या वेळी म्हणाले.
दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी बहुतेक दोन महिन्यांसाठी खोटे बोलायचे नाही, असे ठरवले आहे. त्यामुळे त्यांनी दोन महिने अलिप्त राहण्याचे मौन व्रत धारण केले आहे, असाही राजकीय चिमटा गोरे यांनी राऊत यांना लगावला. कार्तिकी यात्रेच्या निमित्ताने पंढरपुरातील विठ्ठल मंदिरातील ‘व्हीआयपी दर्शन’ हे ९ नोव्हेंबरपर्यंत बंद असणार आहे. त्यामुळे भाविकांना सहज आणि सुलभ दर्शन मिळेल. तसेच, यंदा अतिवृष्टीमुळे पंढरपूरला वारीत भाविकांची संख्या कमी आहे. मात्र, पुढील दोन दिवसांत कदाचित ही संख्या वाढू शकते, असेही पालकमंत्री म्हणाले.
