सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठाने महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील प्रकरणाची पुढील सुनावणी २७ सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलली. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या निर्णयावर प्रतिक्रिया दिलीय. “शिवसेना कुणाकडे हा तांत्रिक भाग आहे. ठाकरे कुणाकडे याला जास्त महत्त्व आहे,” असं मत जयंत पाटलांनी व्यक्त केलं. तसेच उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे यांची परंपरा चालवत आहेत, असंही नमूद केलं. ते बुधवारी (७ सप्टेंबर) एबीपी माझाशी बोलत होते.

जयंत पाटील म्हणाले, “घटनापीठ कालच (६ सप्टेंबर) स्थापन झालं आहे. त्याप्रमाणे त्यांनी या प्रकरणाची पुढील तारीख २७ सप्टेंबर दिली असेल. त्यावेळी काय होतं बघू. शेवटी न्यायालयाचेही प्राधान्यक्रम असू शकतात. काल घटनापीठ स्थापन झालं आहे आणि आज लगेच बसलं पाहिजे अशी अपेक्षा करणंही योग्य नाही. त्यांना त्यांचा वेळ दिला पाहिजे. मात्र, २७ सप्टेंबरला पुन्हा दोन महिन्यांची तारीख आली तर तो वेळकाढूपणा होईल. मात्र, मला खात्री आहे न्यायालय तसं करणार नाही.”

Jayant Patil Ajit Pawar Sharad Pawar
राष्ट्रवादीत फूट पडण्याला कोण कारणीभूत ठरलं? जयंत पाटलांचं सूचक वक्तव्य; म्हणाले…
narendra modi nashik rally
“राज्यातील नेते फुसका बार, तर पंतप्रधान मोदी…”; नाशिकमधील सभेपूर्वी कांदा उत्पादकांना नोटीस देण्यावरून रोहित पवारांचं टीकास्र!
ajit pawar
पंतप्रधान मोदींकडून शरद पवारांना एनडीएत येण्याचा प्रस्ताव, अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
narendra dabholkar mukta dabholkar
Dabholkar Murder Case : निर्दोष सोडलेल्या तिघांविरोधात उच्च न्यायालयात जाणार : मुक्ता दाभोलकर
Nana Patole, Sharad Pawar
काँग्रेसमध्ये प्रादेशिक पक्ष विलीन करण्याच्या पवारांच्या विधानावर नाना पटोलेंचं भाष्य; म्हणाले, “अनेक पक्षांचा…”
supreme court
सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनमध्ये महिलांसाठी आरक्षण लागू, अध्यक्षपदाबाबतही खंडपीठाकडून महत्त्वाचे निर्देश
Do Anjali Damania and Suhas Kande have the right to challenge the acquittal Chhagan Bhujbals question in HC
महाराष्ट्र सदन प्रकरण : दोषमुक्तीला आव्हान देण्याचा अधिकार दमानिया, कांदे यांना आहे का? उच्च न्यायालयातील सुनावणीदरम्यान भुजबळ यांच्याकडून प्रश्न उपस्थित
rohit pawar replied to narendra modi
“महाराष्ट्रात येऊन त्यांना अस्थिर आत्मे दिसू लागले, आता ४ जूननंतर…”; रोहित पवारांचे पंतप्रधान मोदींना प्रत्युत्तर

शिवसेना कुणाकडे हा तांत्रिक भाग आहे. ठाकरे कुणाकडे याला जास्त महत्त्व आहे असं मला वाटतं. उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे यांची परंपरा चालवत आहेत. महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिक उद्धव ठाकरेंनाच प्राधान्य देतील. एखाद्याच्या हातात सगळंच असेल तर त्याचा वापर कसा करायचा हे तेच ठरवत असतात. मात्र, न्यायालय त्याबाबत योग्य निर्णय करेल याची मला खात्री आहे.

घटनापीठात काय झालं?

‘निवडणूक चिन्हासंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगासमोरील सुनावणीला स्थगिती देऊ नये’, असा अर्ज मंगळवारी (६ सप्टेंबर) शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केला. त्यावर, आज (७ सप्टेंबर) न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठासमोर तातडीने सुनावणी घेण्यात आली. या घटनापीठाने या प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली आहे. यावर आता २७ सप्टेंबरला सुनावणी होऊन निर्णय येणार आहे.

निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या पक्षचिन्हाबाबत निर्णय न घेण्याचे लेखी आदेश दिले आहेत का अशी विचारणा घटनापीठाने सुनावणीत केली. याशिवाय दोन्ही पक्षांची बाजू समजून घेतली. यानंतर घटनापीठाने २७ सप्टेंबरला या प्रकरणी दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून निर्णय देऊ, असं स्पष्ट केलं. तसेच निवडणूक आयोगाला २७ सप्टेंबरपर्यंत या प्रकरणात कोणताही निर्णय घेऊ नये, असे निर्देश दिले.

हेही वाचा : …हे लोकशाहीसाठी धोकादायक; शिंदे गटाच्या युक्तिवादावर सुप्रीम कोर्टाने व्यक्त केली भीती; म्हणाले “मग व्हीपचा अर्थ काय?”

दरम्यान, याआधी शिंदे गटाने शिवसेना पक्षावर आणि पक्षाचं निवडणूक चिन्ह धनुष्यबाणावर आपला हक्क असल्याचा दावा करत निवडणूक आयोगाकडे त्यासाठी अर्ज केला होता. याला ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान देत या प्रकरणी निवडणूक आयोगाला निर्णय घेण्यापासून रोखावं अशी मागणी केली होती. या सुनावणीनंतर आता निवडणूक आयोग या प्रकरणात निर्णय घेऊ शकणार की नाही हे २७ सप्टेंबरलाच स्पष्ट होणार आहे.