शिवसेनेपाठोपाठ एका वर्षाने राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही मोठी फूट पडल्याने महाविकास आघाडीबाबत चिंता निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेमके किती आमदार शरद पवारांबरोबर आहेत आणि किती आमदार अजित पवारांबरोबर आहेत हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही. सध्यातरी राष्ट्रवादीच्या एकूण नऊ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. परंतु अजित पवारांच्या गटाकडून, भाजपा तसेच शिंदे गटाकडून केलेल्या दाव्यांप्रमाणे अजित पवारांबरोबर ३० पेक्षा जास्त आमदार आहेत. सध्या या केवळ चर्चा आहेत. आमदारांची नेमकी संख्या अद्याप कोणीही स्पष्ट केलेली नाही. परंतु आमदार फुटल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची विधानसभेतील ताकद मात्र नक्कीच कमी झाली आहे.

सध्या विधानसभेत विरोधी पक्षांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमदारांचं सर्वाधिक संख्याबळ बाळगून असल्यामुळे त्यांच्याकडे विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपद आहे. परंतु जर राष्ट्रवादीचे ३० हून अधिक आमदार अजित पवारांबरोबर गेले तर राष्ट्रवादीला विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपद सोडावं लागेल. त्यामुळे विरोधी पक्षांमधील सर्वात मोठा पक्ष असलेल्या काँग्रेसकडे हे पद येईल. त्याच पार्श्वभूमीवर काही वेळापूर्वी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाबद्दल प्रश्न विचारला. त्यावर जयंत पाटील यांनी स्पष्ट उत्तर दिलं.

हे ही वाचा >> Video: “अजित पवारांनी तीन वेळा प्रयत्न केले”, संजय राऊतांचा मोठा दावा; म्हणाले, “मी ऑन कॅमेरा सांगतो की…!”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जयंत पाटील म्हणाले, विरोधी पक्षनेते पदाबद्दल विधानसभेचे अध्यक्ष हे पक्षांच्या आमदारांच्या संख्याबळानुसार निर्णय घेतील. आमची संख्या सध्या ९ जणांनी (आमदारांनी) कमी झाली आहे. कारण ते आता गेलेलेच आहेत. उरलेले आमदार हे राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरच आहेत. या सगळ्या प्रकरणात आम्हाला काँग्रेसशी स्पर्धा करायची नाही. काँग्रेस आणि आम्ही एकत्रित बसून यावर (विरोधी पक्षनेते पदाबद्दल) निर्णय घेऊ. आमच्या आमदारांची संख्या कमी असेल, अर्थात असं पुढे सिद्ध झालं तर काँग्रेसचा विरोधी पक्षनेता होईल, परंतु यासाठी काही दिवस लागतील.