महाराष्ट्राचे श्रध्दास्थान व अठरा पगड जातीचे कुलदैवत म्हणून प्रसिध्द असलेल्या जेजुरीच्या खंडोबा देवाच्या सोमवती अमावस्या यात्रेसाठी सुमारे तीन लाख भाविकांनी हजेरी लावली. दुपारी एक वाजता सनई-चौघड्यांच्या निनादात ‘येळकोट येळकोट जय मल्हार’, असा जयघोष करत श्री खंडोबाची पालखी कर्‍हा स्नानासाठी निघाली. सायंकाळी पाच वाजता हजारो भाविकांच्या उपस्थितीत कर्‍हा नदीवर पालखीतील खंडोबा म्हाळसादेवींच्या मूर्तींना विधीयुक्त स्नान घालण्यात आले. श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी ही भर सोमवती अमावस्या असल्याने भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्याच्या काही भागात असलेला बैल पोळा, सोमवारचे उपास, दोन दिवस पडत असलेला पाऊस याचा यात्रेवर काही प्रमाणात परिणाम जाणवला. पण, तरी सुध्दा तीन लाखांपर्यंत भाविक जेजुरीत आले होते. राज्याच्या बहुतांशी भागामध्ये दोन दिवस पडत असलेल्या पावसामुळे येथे आलेल्या भाविकांच्या चेहर्‍यावर समाधान होते. खंडोबा देवाला जेथे स्नान घातले जाते, ते पात्र कोरडे ठणठणीत पडले होते. या परिसरात पाऊस झाला. मात्र नदीला अद्याप पाणी आलेले नसल्याने जेजुरी नगरपालिकेने या ठिकाणी टँकरच्या पाण्याची सोय केली होती.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jejuri yatra 2017 khandoba lot of people visit jejuri
First published on: 21-08-2017 at 18:25 IST