गणित म्हटले की अनेक विद्यार्थ्यांच्या कपाळावर आठ्या येतात. अनेकांचा नावडता विषय असलेला हाच गणित विषय मात्र आता गावातीलच नाही तर जगभरातील विद्यार्थ्यांना आवडू लागला आहे. याचे कारण म्हणजे जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक प्रवीण बनकर. उस्मानाबाद तालुक्यातील देवळाली नावाच्या छोटेखानी गावात जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक असलेल्या बनकर यांनी युट्युबवर गणित शिकवण्याच्या प्रकारांचे अफलातून सादरीकरण केले आहे. एक-दोन नव्हे तर तब्बल ७६  लाख अभ्यासकांनी त्याला भेट दिली आहे. तर दीड लाखाहून अधिकजण सातत्याने त्यांनी विकसित केलेल्या अध्ययन पध्दतीचा अवलंब करीत आहेत. विद्यार्थ्यांच्या हजेरीचा टक्का घसरत असताना बनकर यांनी जगभरातील विद्यार्थ्यांना आपल्याकडे आकर्षित केले आहे. बनकर यांच्या ४५० चित्रफितींनी नेटकर्‍यांच्या मनावर मोठा प्रभाव टाकला आहे. त्यामुळे युट्युबने त्याची दखल घेवून त्यांना ‘सिल्वर’ पुरस्कार देवून सन्मानित केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्य शासनाचा प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम बहुतांश शिक्षकांना अद्या समजलेला नाही. मात्र ज्यांना समजला अशा तंत्रस्नेही शिक्षकांनी काळाबरोबर झेप घेत अफलातून प्रयोग केले आहेत. उस्मानाबाद तालुक्यातील देवळाली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असलेले प्रवीण किसनराव बनकर मागील १२ वर्षांपासून ज्ञानदानाचे काम करतात. मागच्या वर्षी त्यांनी उस्मानाबाद येथील जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेमध्ये एक वर्ष तंत्रस्नेही विषय सहायक म्हणून काम केले. जिल्ह्यातील शिक्षकांनी युट्यूब चॅनलचा वापर शिक्षण आणि प्रशिक्षणात कसा करावा, याबाबत त्यांनी शिक्षकांना धडे दिले. गणित म्हणजे अवघड विषय असा अनेकांचा गैरसमज असतो. त्यांच्यासाठी बनकर यांनी ‘इ-जिनिअस’ नावाने युट्यूब चॅनल सुरू केले. त्यावर तब्बल ४५० चित्रफिती अपलोड केल्या.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jilha parishad teacher youtube channel for mathematics pravin bankar osmanabad devlali e genius
First published on: 02-12-2018 at 18:15 IST