राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. सध्या ते वर्तकनगर पोलीस ठाण्यात असून त्यांचा जबाब नोंदवून घेण्याचं काम सुरू आहे. जितेंद्र आव्हाडांच्या समर्थकांनी पोलीस ठाण्याबाहेर मोठी गर्दी केली आहे. या घटनाक्रमानंतर जितेंद्र आव्हाडांच्या पत्नी ऋता आव्हाड यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे. त्यांनी जितेंद्र आव्हाडांच्या अटेकबाबत गंभीर आरोप केला आहे.

जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी ठाण्यातील विवीयाना मॉलचे व्यवस्थापक आणि सिनेपोलीस चित्रपटगृहाच्या कर्मचाऱ्यांवर दबाव टाकला जातोय, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. त्या ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होत्या.

हेही वाचा- अटकेआधीच संजय राऊतांनी संपूर्ण कुटुंबाला दिला होता बहुमोल सल्ला; स्वत:च केला खुलासा, म्हणाले…

यावेळी ऋता आव्हाड म्हणाल्या की, जितेंद्र आव्हाडांविरोधात ज्यांनी कुणी गुन्हा दाखल केला आहे, त्यांच्यापैकी कुणीही घटनास्थळी उपस्थित नव्हतं. संबंधित सर्व घटना अवघ्या ७ मिनिटांत घडली आहे. त्यामुळे ‘तुम्ही तक्रारदार व्हा’ असं म्हणत ते सिनेपोलीस चित्रपटगृहाच्या कर्मचाऱ्यांवर आणि विवीयाना मॉलच्या व्यवस्थापकावर दबाव टाकत आहेत, असा आरोप जितेंद्र आव्हाडांच्या पत्नीने केला आहे.

हेही वाचा- “…तर मी अटकेचं मनापासून स्वागत करते” जितेंद्र आव्हाडांवरील कारवाईनंतर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नेमकं प्रकरण काय आहे?
‘हर हर महादेव’ या चित्रपटातून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास चुकीचा दाखवण्यात आला आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला होता. दरम्यान, त्यांनी सोमवारी रात्री उशिरा ठाण्यातील विवीयाना मॉलमधील चित्रपटगृहात प्रवेश करत, ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा शो बंद पाडला. यावेळी काही प्रेक्षकांना मारहाणही झाली. या प्रकरणी ठाणे पोलिसांनी जितेंद्र आव्हाडांसह १०० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे. यानंतर पोलिसांनी आव्हाडांना अटक केली असून त्यांचा जबाब नोंदवला जात आहे.