scorecardresearch

Premium

“अजित पवारांना राष्ट्रीय अध्यक्ष कुणी केलं? त्याचा काही…”, जितेंद्र आव्हाड यांचा सवाल

जितेंद्र आव्हाड यांची अजित पवार गटावर कडाडून टीका

What Jitendra Awhad Said?
अजित पवारांना अध्यक्ष कुणी केलं? जितेंद्र आव्हाडांचा सवाल

अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून कुणी नेमलं? त्यांना पाठिंबा कुणी दिला? त्याचे काही पुरावे आहेत का? असे प्रश्न आज शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले आहेत. काही वेळापूर्वीच शरद पवार आणि जितेंद्र आव्हाड यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत जितेंद्र आव्हाड बोलत होते.

अचानक अजित पवार अध्यक्ष कसे झाले?

२ जुलैला अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यानंतर ३ जुलैच्या दिवशी शरद पवार आमचे अध्यक्ष आहेत असं म्हटलं होतं. मग अजित पवार हे अध्यक्ष कसे काय झाले? असा प्रश्नही जितेंद्र आव्हाड यांनी विचारला आहे. ३० जून रोजी अजित पवार गटाने आम्ही बैठक घेतली आणि अजित पवार यांना राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जाहीर केलं असं सांगितलं. अशी कुठलीही बैठक झाली नाही. याबाबत विचारलं असता असं कळलं की फोनवरुन बैठक झाली. अशा बैठका कधीही फोनवरुन होत नसतात. अजित पवारांना अध्यक्ष करण्यासाठी कुणी पाठिंबा दिला आहे ते सांगा असाही प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी विचारला आहे.

Uddhav Thackeray SHarad Pawar Praful Patel
“राष्ट्रवादीने उद्धव ठाकरेंकडे अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद मागितलेलं; पण…”, प्रफुल्ल पटेलांचा गौप्यस्फोट, म्हणाले…
sanjay-raut-on-devendra-fadnavis-interview
“त्यांचा एक भंपक…”, राष्ट्रपती राजवटीवरून शरद पवारांवर आरोप करणाऱ्या फडणवीसांना राऊतांचं प्रत्युत्तर
Devendra Fadnavis on OBC reservation
“ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही,” उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही; म्हणाले, “मराठा समाजाचा..”
Manoj Jarange Patil on Hunger Strike
“मनोज जरांगे पाटील यांना कळकळची विनंती…”, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांचं ट्विट

पत्रकार परिषद खोटं लपवण्यासाठी होती

सोमवारी अजित पवार गटाची पत्रकार परिषद ही आम्ही जे खोटं बोललो तेच कसं खरं होतं हे दाखवण्यासाठी होती असाही आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला. तसंच ३ जुलै रोजी जर अजित पवार म्हणत होते की शरद पवार आमचे अध्यक्ष आहेत तर मग अजित पवार हे राष्ट्रीय अध्यक्ष कसे काय झाले? अजित पवार हे अध्यक्ष नाहीत तरीही ते राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सही कशी करतात? पक्षातल्या ९५ टक्के लोकांनी शरद पवार यांना अध्यक्ष म्हणून पाठिंबा दिला आहे असंही आव्हाड यांनी म्हटलं आहे.

शिवसेना आणि राष्ट्रवादीची केस वेगळी आहे असं अजित पवार गटाचे खासदार प्रफुल्ल पटेल म्हणाले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली. ते म्हणाले की, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीमागचे लेखक, पटकथा, दिग्दर्शक एकच आहेत, फक्त कलाकार बदलले आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Jitendra awhad ask question about ajit pawar who made him president of ncp scj

First published on: 26-09-2023 at 18:42 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×