राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि मंत्री हसन मुश्रीफ यांच्यात पुन्हा टीका-टिप्पणी सुरू झाली आहे. “एकनाथ शिंदे गुवाहाटीला गेल्यानंतर भाजपाबरोबर सत्तेत जाण्यासाठी जितेंद्र आव्हाडांनी पुढाकार घेतला होता. ५३ आमदारांमध्ये सर्वात पहिली सही जितेंद्र आव्हाडांची होती,” असा दावा हसन मुश्रीफांनी केला होता. याला आव्हाडांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

जितेंद्र आव्हाड म्हणाले, “माझ्या राजकीय जीवनात हसन मुश्रीफांना ५ मिनिटांवरती अधिक मी बोललो नाही. २०१९ साली शरद पवारांच्या पुण्यातील घरी बैठक झाली होती. त्या बैठकीला सर्व प्रमुख नेते उपस्थित होते. तेव्हा हसन मुश्रीफांनी भाजपाबरोबर जाऊ नये म्हणून टोकाचा विरोध केला होता.”

हेही वाचा : खासदार सुप्रिया सुळेंच्या निलंबनावर अजित पवारांचं परखड भाष्य; म्हणाले, “कुठल्या तरी नियमाचा…”

“जयंत पाटलांनी शरद पवारांना पत्र दिलंच नाही”

“नंतर २०२२ साली एकनाथ शिंदेंची फूट पडल्यानंतर सर्वजण अजित पवारांच्या कार्यालयात एकत्र आलो. त्यावेळी शरद पवारांना पत्र लिहित भाजपाबरोबर जाण्यासाठी विनंती करू, असं ठरलं. मी पत्रावर सही केली. पण, बाहेर आल्यानंतर जयंत पाटलांना सांगितलं की, ‘माझी सही मान्य नाही. मी काय भाजपाबरोबर जाणार नाही.’ जयंत पाटीलही त्याच विचारांचे होते. जयंत पाटलांनी शरद पवारांना पत्र दिलंच नाही. आजही ते पत्र जयंत पाटलांकडे आहे. नंतर भाजपाबरोबर जाण्यासाठी सतत आग्रह करणाऱ्यांमध्ये हसन मुश्रीफही होते,” असं आव्हाडांनी सांगितलं.

हेही वाचा : “सगळं यालाच कळतं का?” अजित पवार गटातील मंत्र्याची आव्हाडांवर टीका; म्हणाले, “पक्षात कुणी विचारत नसल्यानं…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“माझ्या तोंडाला लागू नका”

‘आव्हाड एकाकी पडले आहेत. पक्षात कुणीच विचारत नसल्यानं थोटे भ्रमिष्ट अवस्थेत आहेत,’ अशी टीका हसन मुश्रफांनी केली होती. यावर बोलताना आव्हाडांनी म्हटलं, “मी माझ्या बापाशी गद्दारी केली नाही. सदाशिवराव मंडलिक यांनी तुम्हाला कुठं पोहचावलं हे सगळ्या कोल्हापुरला माहिती आहे. मी तुमच्या नादाला लागलो नाही. माझ्या तोंडाला लागू नका.”