‘एमपीएससी’ची संयुक्त पूर्वपरीक्षा ४ सप्टेंबरला

करोनाच्या पाश्र्वभूमीवर महाराष्ट्र दुय्यम सेवा ‘अराजपत्रित गट ब’ संयुक्त पूर्वपरीक्षा लांबणीवर टाकण्यात आली होती.

नागपूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) घेण्यात येणारी संयुक्त पूर्वपरीक्षा गट-ब अखेर ४ सप्टेंबर २०२१ रोजी होणार आहे. त्यामुळे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

करोनाच्या पाश्र्वभूमीवर महाराष्ट्र दुय्यम सेवा ‘अराजपत्रित गट ब’ संयुक्त पूर्वपरीक्षा लांबणीवर टाकण्यात आली होती. ही परीक्षा ११ एप्रिल २०२१ रोजी होणार होती. मात्र, एप्रिलमध्ये करोना संसर्ग वाढल्याने विद्यार्थ्यांनी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती. त्यामुळे राज्य शासनाने परीक्षा लांबणीवर टाकली. मात्र, करोनाचा प्रादुर्भाव कमी होतानाही परीक्षेची नवी तारीख जाहीर केलेली नव्हती. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये असंतोष वाढत होता. परीक्षेची तारीख जाहीर न झाल्यास क्रांतिदिनी राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशाराही परीक्षार्थीनी दिला होता. मात्र, आपत्ती व्यवस्थापन विभागाने परवानगी दिली नसल्याचे आयोगाकडून सांगण्यात येत होते.

आता आपत्ती व्यवस्थापन विभागाने परीक्षा घेण्यास परवानगी दिल्याने परीक्षेचा मार्ग मोकळा झाला आहे. ‘एमपीएससी’ने आता ही परीक्षा ४ सप्टेंबर २०२१ रोजी होणार असल्याचे परिपत्रक काढले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Joint pre examination of mpsc will be held on september 4 zws

ताज्या बातम्या