सांगली : पंजाबमध्ये सहा महिन्यापुर्वी अडीच किलो सोन्याच्या चोरीचा छडा लावण्यात कवठेमहांकाळ पोलीसांना यश आले असले तरी मुख्य सूत्रधार अद्याप फरार आहे. चोरलेल्या सोन्यापैकी ४० लाखाचे ८१५ ग्रॅम सोने मात्र पोलीसांनी हस्तगत केले आहे.

याबाबत माहिती अशी की, पंजाबमधील अमृतसर जिल्ह्यातील जिंदायल येथील सागर ज्वेलर्समध्ये सुमारे अडीच किलो सोने लंपास झाले होते. या प्रकरणी १३ जानेवारी रोजी ज्वेलर्समध्ये काम करणारा अनिकेत कदम याच्याविरूध्द पंजाब पोलीसामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अनिकेत हा मुळचा कवठेमहांकाळ तालुक्यातील नरसिंहपूर (लांडगेवाडी) येथील रहिवाशी असल्याने पंजाब पोलीस तपास करीत कवठेमहांकाळ येथे पोहचले. कवठेमहांकाळ पोलीसांच्या मदतीने पंजाबच्या पोलीसांनी संयुक्त कारवाई करीत अनिकेतच्या घरी छापा मारला असता ४०लाखाचे ८१५ ग्रॅम सोने आढळून आले. या प्रकरणी अनिकेतचे वडिल विठ्ठल कृष्णा कदम यांना पोलीसांनी अटक केली असून मुख्य चोरटा अनिकेत मात्र फरार आहे.